Sat, Dec 14, 2019 04:44होमपेज › Soneri › सलमान खानकडून शिवानी सुर्वेला मिळाले सरप्राईज 

सलमान खानकडून शिवानी सुर्वेला मिळाले सरप्राईज 

Published On: Aug 13 2019 2:00PM | Last Updated: Aug 13 2019 1:58PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बिग बॉस मराठीच्या दुस-या पर्वात विकेन्डला सर्वांना एक छान सरप्राईज मिळालं. बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानची चक्क विकेन्डला शोमध्ये एन्ट्री झाली. लहानपणापासून सलमान खानची चाहती असलेल्या शिवानी सुर्वेसाठी तर सलमान खानला याची देही याची डोळा पाहणं आणि त्याच्यासोबत बातचीत करायला मिळणं हा सुखद आश्चर्याचा धक्का होता.

महेश मांजरेकरांनी शिवानीचा परिचय करून देताना, ‘अँग्री यंग वुमन’ असा करून दिला. म्हणूनच सलमान खानला शोमध्ये आलेलं पाहून शिवानीने महेश मांजरेकर यांना प्रश्नही विचारला की, “सर, हे स्वप्न आहे, की सत्य हेच मला समजत नाही.”

सलमाननेही आपल्या चाहतीची थट्टा-मस्करी करायला सुरूवात केली. सलमान म्हणाला, “हो मी सलमानचा डुप्लिकेट आहे. खरं तर, मी तुला माझ्या एका फिल्ममध्ये घेणार होतो. पण तू बिग बॉसच्या घरात आहेस. तुला जर फिल्म करायची असेल, तर एक पर्याय आहे. तिथे कुणाला तरी थप्पड मारून निघून ये. नियमांचं उल्लंघन करून टाक.”

शिवानीने यावेळी आठवणी सांगितल्या, “पूर्वी सलमान खानच्या घराखाली जाऊन मी अनेकदा ‘जानम समझा करो’ चित्रपटातलं मधलं ‘जिद ना करो जरा समझा करो’ हे गाणं नेहमी गायचे.”

यावेळी शिवानीने सलमानसमोर त्याच्याच 'मुझसे शादी करोगे' या सिनेमातील ‘जिने के है चार दिन’ या गाण्यावर डान्स करून सलमानकडून कौतुक करून घेतले.