BB : पारसने केली सिद्धार्थची बदनामी

Last Updated: Oct 18 2019 6:28PM
Responsive image

Responsive image

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बिग बॉसच्या घरात सिद्धार्थ शुक्ला सध्या जोरदार गेम खेळताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरामध्ये अधिकतर सदस्य त्याच्याविरोधात आहेत. पारस छाबडा घरातील महिला सदस्यांशी मैत्री करून गेम खेळत आहे. 

कालच्या एपिसोडमध्ये पारसने सिद्धार्थ शुक्लाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. पारस देवोलीनाशी बोलत होता आणि तिला सांगत होता की, सिद्धार्थ शुक्लाची काय परिस्थिती आहे. देवोलीनादेखील पारसच्या या सर्व गोष्टी खूप लक्ष देऊन ऐकत होती. देवोलीना आणि सिद्धार्थ यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. 

पारस छाबडा देवोलीनाला सांगत होता की, त्याचा ड्रायव्हर आणि पारस छाब्राचा ड्रायव्हर एकमेकांना ओळखतात. मला माहित आहे की, सिद्धार्थ शुक्ला एक वर्ष कुठे राहिला आहे. पारसने सिद्धार्थच्या पोटाकडे इशारा करून सांगितलं की, त्याचे पोट बाहेर आले आहे. सिद्धार्थ शुक्लाने आपले पोट स्टेरॉयड खाऊन आत घेतलं आहे. याप्रकारे पारस छाबडा उघडपणे सिद्धार्थ शुक्लाविषयी या गोष्टी पसरवत आहे.