Tue, Mar 26, 2019 07:42होमपेज › Soneri › श्रीसंतला सोडावे लागले बिग बॉसचे घर  

श्रीसंतला सोडावे लागले बिग बॉसचे घर  

Published On: Oct 11 2018 6:59PM | Last Updated: Oct 11 2018 6:58PMनवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

बिग बॉस-१२ च्‍या घरात चौथ्‍या आठवड्‍यातही सर्व कंटेस्टेंट आणि प्रेक्षकांसाठी मोठं ट्विस्ट आलं आहे. यावेळी 'वीकेंड का वॉर'च्‍या एपिसोडपूर्वीच मिड वीकमध्‍ये नॉमिनेटेड सदस्य श्रीसंत बेघर झाला. या निर्णयानंतर दीपिका, सृष्टी, उर्वशीसह  अनेक सदस्य दुखी झाले. 

या आठवड्‍यात करणवीर बोहरा, श्रीसंत आणि नेहा पेंडसे नॉमिनेटेड झाले होते. मिड वीक इविक्शनमध्‍ये श्रीसंतला सर्वात कमी मते मिळाली. परंतु, त्‍यातेदखील एक ट्‍विस्‍ट आहे. बिग बॉसने श्रीसंतला शोतून बाहेर केलं नाही. त्‍याला अनूप जलोटाच्‍या सीक्रेट रूममध्‍ये पाठवलं. करणवीर बोहरा आणि नेहा पेंडसे अजूनही सुरक्षित नाहीत. या आठवड्‍यात हे दोघेही नॉमिनेटेड आहेत. यांना मते देण्‍यासाठी वोटिंग लाईक खुली करण्‍यात आली आहे.