होमपेज › Soneri › चित्रीकरणावेळी जखमी झाले बिग बी, पण...

चित्रीकरणावेळी जखमी झाले बिग बी, पण...

Published On: Aug 13 2017 10:54AM | Last Updated: Aug 13 2017 10:53AM

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाइन वृत्त

मेगास्टार अमिताभ बच्चन ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी जखमी झाले आहेत. पण आपल्यामुळे कोणाला वाट पहावी लागू नये यासाठी जखमी अवस्थेतही त्यांनी चित्रीकरण पूर्ण केले.

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटातील प्रसंग चित्रीत करत असताना बिग बींचा पाय फ्रॅक्चर झाला होता. त्यानंतर त्यांना बॅकपेनचा त्रासही होऊ लागला. पण चित्रीकरणाचे बिझी शेड्यूल बिघडू नये म्हणून बिग बींनी चित्रीकरण चालूच ठेवावे असे सांगितले. पाय व पाठीच्या दुखण्यासोबतच त्यांनी चित्रीकरण पूर्ण केले.