Thu, Mar 21, 2019 09:02होमपेज › Soneri › प्रियांकाच नाही 'या' देखील निकवर फिदा!

प्रियांका चोप्राच नाही 'या' देखील निकवर फिदा!

Published On: Jul 12 2018 4:50PM | Last Updated: Jul 12 2018 5:09PMनवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

मध्‍यंतरी सोशल मीडियावर प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक  निक जोनस यांच्‍यातील तथाकथित अफेअरची चांगलीच चर्चा रंगली होती. गेल्‍या काही दिवसांपूर्वी दोघांचे फोटोही समोर आले होते.  प्रियांका आणि निक या दोघांची मैत्री इतकी खास आहे की, त्‍यांच्‍याबद्‍दल रोज एक वृत्त येत होते. प्रियांकाच्‍या आधी २५ वर्षांच्‍या  निक जोनसच्‍या आयुष्‍यात सात जणी (सुंदर्‍या) आल्‍या होत्‍या. निकच्‍या आयुष्‍यातील गर्लफ्रेंड, त्‍याची डेटिंग हिस्‍ट्री आणि ब्रेकअपची कारणे पाहिलीत तर आवाक राहाल. 

मिली सायरस

तेरा वर्षांचा असताना निक जोनसला मिली सायरसशी प्रेम झालं होतं.  मिली ही निकची पहिली गर्लफ्रेंड असल्‍याचं म्‍हटलं जातं. हे दोघे पहिल्‍यांदा २००६ मध्‍ये एका चॅरिटी इव्‍हेंटमध्‍ये भेटले होते. हा इव्‍हेंट एका चॅनेलने आयोजित केलं आहे. तेथून हे एकमेकांना डेट करू लागले. परंतु, हे प्रेम फार काळ टिकलं नाही. १ वर्षांनंतर म्‍हणजेच २००७ मध्‍ये त्‍यांचं ब्रेकअप झालं. 

Related image

सेलेना गोमेज

मिली सायरसशी वेगळं झाल्‍यानंतर २००८ मध्‍ये निकने सेलेना गोमेजला डेट केलं. यावर्षी 'बर्निंग अप' सॉन्गमध्‍ये सेलेना गोमेज आणि निक जोनसने एकत्र स्टेज शेअर केलं होतं. त्‍यावेळी निक १५ वर्षांचा होता. हे डेटिंग एक वर्षच राहिलं.  ब्रेकअपनंतरही दोघे एकमेकांना भेटत असत, असे म्‍हटले जायचे. ही भेट पुन्‍हा २०१० मध्‍ये रोमान्‍समध्‍ये बदललं. परंतु, पुन्‍हा त्‍यांचं प्रेम टिकलं नाही. दोघांनी ब्रेकअप केलं. 

Related image

लिली कॉलिन्स

सेलेनाशी ब्रेकअप केल्‍यानंतर निकच्‍या आयुष्‍यात ब्रिटिश अभिनेत्री लिली कॉलिन्सने एन्‍ट्री घेतली. असं म्‍हटलं जात की, सेलेना गोमेज आणि निकमध्‍ये दुरावा निर्माण होण्‍याच कारण लिली होती, असं म्‍हटलं जात होतं. परंतु, नंतर ट्विटरवर निकने स्‍वत: लिलीसोबतच्‍या रिलेशनशीपला नकार दिला. 

Image result for singer nick girlfriend lily collins

डेल्टा गुड्रम

फेब्रुवारी २०१२ पर्यंत निकने डेल्टा गुड्रमला डेट केलं आणि काही कारणाने त्‍यांच्‍यात ब्रेकअप झाला. त्‍यांच्‍या ब्रेकअपमागे कुठलेही खास कारण समोर आले नाही. 

Related image

केंडाल जेनर

एक न्यूज पोर्टलच्‍या सूत्रांच्‍या हवाल्‍याने माहिती मिळाली होती की, निक आणि केंडाल जेनरने २०१५ म्‍ये एकमेकांना डेट करणं सुरू केलं होतं. 

Image result for singer nick girlfriend kendall jenner

जॉर्जिया फॉलर

गतवर्षी असे वृत्त समोर आले होते की, 'व्‍हिक्टोरिया सीक्रेट' मॉडल जॉर्जिया फॉलरसोबत निक डेट करत आहे. ही गोष्‍ट तेव्‍हाची आहे जेव्‍हा निक त्‍याचा भाऊ जोच्‍या साखरपुड्‍याच्‍या पार्टीत जॉर्जियासोबत दिसला होता. तर दोघेही कॅज्‍युअली डेटिंग करत असल्‍याचेही वृत्त होते. 

ओलिविया कल्पो

ओलिविया कल्पो

ओलिविया आणि निक यांचं रिलेशनशीप बरेच दिवस टिकलं. निकच्‍या आयुष्‍यात कुठलीही मुलगी १ वर्षांपेक्षा जास्‍त काळ टिकत नाही, असं म्‍हटलं जातं. मात्र, याबाबत ओलिविया सर्वांत लकी ठरली. निक-ओलिवियाचं रिलेशनशीप २०१३ मध्‍ये सुरू झालं होतं. २ वर्षांनंतर दोघेही २०१५ मध्‍ये वेगळे झाले. 

Image result for singer nick girlfriend olivia culpo

प्रियांका चोप्रा

निक आणि बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्राचं नाव जोडलं गेलं काही दिवसांपूर्वी निक जोनस प्रियांकासोबत भारतात आला होता. गोव्‍यात एन्‍जॉय केल्‍यानंतर त्‍यांनी आकाश अंबानीच्‍या फंक्‍शनलाही हजेरी लावली होती. शिवाय, प्रियांकाने निकला आपल्‍या आईशी भेटवल्‍याचेही वृत्त होते. आता निक आणि प्रियांकाची मैत्री किती काळ टिकते, हे पाहावे लागेल. 
Image result for singer nick and priyanka