Tue, May 30, 2017 04:05
29°C
  Breaking News  


होमपेज › Soneri › 'बाहुबली २'ने २१ दिवसात कमावले इतके कोटी

'बाहुबली २'ने २१ दिवसात कमावले इतके कोटी

By pudhari | Publish Date: May 19 2017 4:43PM


मुंबई : वृत्तसंस्था

बॉक्सऑफिसवर जबरदस्त यश मिळवणाऱ्या 'बाहुबली २' या चित्रपटाने १ हजार ५०० कोटींची कमाई केली आहे. आजपर्यंत कोणत्याही भारतीय चित्रपटाला ऐवढे मोठे यश मिळवता आले नाही. 

चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांच्या या चित्रपटाने २१ दिवसांमध्ये १,५०० कोटी रुपये कमावले आहेत.या चित्रपटाने आतापर्यंत भारतात १ हजार २२७ कोटी तर भारताबाहेर २७५ कोटींची कमाई केली आहे.

'बाहुबली २' चित्रपटाला इतके मोठे यश मिळेल याची आम्हाला खात्री होती. या यशासाठी आम्ही खुप वाट पाहिल्याचे राजामौली यांनी सांगितले.