Mon, Aug 26, 2019 14:47होमपेज › Soneri › #sareetwitter साडी नेसून लाजतोय आयुष्मान

#sareetwitter साडी नेसून लाजतोय आयुष्मान

Published On: Jul 20 2019 1:23PM | Last Updated: Jul 20 2019 1:17PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बॉटल कॅप चॅलेंजनंतर आता सोशल मीडियावर  #sareetwitter गेल्या दिवसांपासून हॅशटॅग ट्रेंड सुरू झाला आहे. यामध्ये sareetwitter हा हॅशटॅग वापरून महिला आपापला साडीतील फोटो सोशल मीडियावरून पोस्ट करत आहेत. यामध्ये फक्त सामान्य महिलाच नाही तर राजकारणी, समाजकारणी आणि बॉलिवूडमधील अनेक स्टार्सही सहभागी झाले आहेत. यामधील विशेष बाब म्हणजे, बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुरानाने आपला एक साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. याआधी बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राही या हॅशटॅग ट्रेंडमध्ये सहभागी झाली होती.  

या फोटोत आयुष्मान ब्लू रंगाच्या साडीमध्ये दिसत असून त्याने साडीसोबत मॅचिंग बांगडया परिधान केल्या आहेत. या फोटोत आयुष्मान खूपच सुंदर दिसत असून त्याचे एक्सप्रेशन्सही जबरदस्त दिसत आहेत. तसेच ते एका स्कूटरवर बसल्याचे दिसत आहे. तर या फोटोला आयुष्मानने एक कॅप्शन लिहिली आहे की, 'ड्रिमगर्ल या वर्षाच्या शेवटी #SareeTwitter.'

#sareetwitter या हॅशटॅग ट्रेंडमध्ये रेणुका शहाणे, नगमा, दिव्या दत्ता, यामी गौतम, गुल पनाग, तिसका चोप्रा यांसारख्या स्टार्सनी सहभाग नोंदवला आहे. 

(video : manishmalhotra05, priyankachopra instagram and photo : Ayushmann Khurrana, Nagma, Renuka Shahane, Divya Dutta, Yami Gautam, Gul Panag, Tisca Chopra instagram वरून साभार)