Thu, Mar 21, 2019 09:09होमपेज › Soneri › मादाम तुसाँमध्‍ये अनुष्‍का शर्माचा 'बोलका' पुतळा 

मादाम तुसाँमध्‍ये अनुष्‍का शर्माचा 'बोलका' पुतळा 

Published On: Jul 12 2018 12:29PM | Last Updated: Jul 12 2018 12:31PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवुड अभिनेत्री अनुष्‍का शर्माची नव्‍याने ओळख सांगण्‍याची गरज नाही.  यशराज बॅनरच्‍या बँड बाजा बारात या चित्रपटातून तिन्‍हे बॉलिवुडमध्‍ये  दमदार एन्‍ट्री केली. तेव्‍हापासून ते आजपर्यंत तिचे नाव बॉलिवुडच्‍या यशस्‍वी अभिनेत्री म्‍हणून घेतले जाते. तिन्‍हे तिच्‍या अभिनयामुळे बॉलिवुडमध्‍ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनुष्‍काने बॉलिवुडमध्‍ये एकापेक्षा एक यशस्‍वी चित्रपट दिले आहेत. ती यशस्‍वी अभिनेत्री तर आहेच पण त्‍यानंतर तिन्‍हे पाठीमागील वर्षी क्रिकेटर विराट कोल्‍ही  याच्‍याशी लग्‍न केले. विराट कोल्‍ही हा आपल्‍या खेळासाठी देशासह जगभरात ओळखला जातो. लग्‍नानंतर याचा फायदा अनुष्‍काला झाला. तिची ब्रँड व्‍ह्यालूमध्‍ये वाढ झाली. आज तिचेही देशासह, जगभरात अनुष्‍काचे चाहते आहेत. 

Image result for anushka sharma

सिंगापूरमधील मादाम तुसाँ संग्रहालयाने अनुष्‍काच्‍या प्रसिद्‍धीची दखल  घेतली आहे. मादाम तुसाँ संग्रहालयात अनुष्‍काचा मेणाचा पुतळा उभारला जाणार आहे. लवकरच अनुष्‍का शर्मा क्रिस्टियानो रोनाल्डो आणि  ओपरा विनफ्रे  यांच्‍यासोबत दिसणार आहे. अनुष्‍काच्‍या चाहत्‍यांसाठी ही खुशखबर आहे.  करणार आहे. मादाम तुसाँ संग्रहालयात अनुष्‍काचा 'बोलणारा' मेणाचा पुतळा असणार आहे, हेच नवीन फीर्च असणार आहे.  विशेष म्हणजे हा पुतळा चाहत्यांसोबत गप्पाही मारणार आहे. अनुष्काचा हा पुतळा बोलका असणार आहे आणि अशा प्रकारचा पुतळा सिंगापूरच्या संग्रहालयात असणारी अनुष्का शर्मा ही भारतातील पहिली सेलिब्रिटी आहे.

यावर्षी अनुष्‍का शर्माचा 'परी' या हॉरर चित्रपटाने बॉक्‍स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या वर्षाच्‍या शेवटपर्यंत अनुष्‍का शाहरुख खानच्‍या 'जीरो'  या चित्रपटात महत्त्‍वाच्‍या भूमिकेत दिसणार आहे.