Wed, Oct 16, 2019 19:47होमपेज › Soneri › शाहरुखकडून 'बदला'चे पोस्टर रिलीज

शाहरुखकडून 'बदला'चे पोस्टर रिलीज

Published On: Feb 12 2019 4:15PM | Last Updated: Feb 12 2019 4:33PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री तापसी पन्नू  यांच्या 'पिंक' या चित्रपटानंतर आता ते 'बदला' हा नवीन चित्रपट घेवून येत आहेत. या चित्रपटाची निर्मिती सुपरस्टार शाहरुख खानच्या रेड चिली प्रोडक्शनद्वारे केली आहे. शाहरुखने सोशल मीडियावर 'बदला'चे पोस्टर रिलीज केले आहे. 

शाहरुखने आपल्या ट्विटर अकाउंटवरून 'बदला' चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू यांचा लुक दिसत आहे. 

या पोस्टरसोबत शाहरुखने म्हटले आहे की, "आता वातावरण बदलल्यासारखे दिसते आहे, हा सिनेमाचा पहिला लुक आहे, त्यात तपस्या पन्नू आणि सीनियर बच्चन यांचा समावेश आहे, यानंतर पोस्टरवर लिहले आहे की, "क्षमा करणे नेहमीच बरोबर नसते."

 या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजॉय घोष यांनी केले आहे. 'बदला' या चित्रपट मार्च २०१९ मध्ये रिलीज होणार आहे. तर आज (१२ फेब्रुवारी) मंगळवारी चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले.   

या चित्रपटाची कथा खूनाच्या रहस्यावर आधारीत आहे. या चित्रपटाशिवाय अक्षय कुमारच्या आगामी चित्रपट 'मिशन मंगल' मध्ये तापी पन्नूदेखील दिसणार आहे. 
तर अमिताभ बच्चन हे आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या 'ब्रह्मस्त्रा' या चित्रपटात  दिसणार आहेत.
 

(photo : Shah Rukh Khan and taran adarsh वरून साभार) ‏