केबीसीत शिवरायांचा अवमान, 'बिग बी' यांनी मागितली माफी 

Last Updated: Nov 09 2019 2:22PM
Responsive image
ट्विट करून अशी मागितली माफी


मुंबई : पुढारी ऑनलाईन 

'कौन बनेगा करोडपती' (केबीसी) मधील एका शोमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केल्याने वाद निर्माण झाला होता. सोशल मीडियावरून या शोला विरोध होत होता. औरंगजेबाला 'मुगल सम्राट' आणि छत्रपती शिवरायांना 'शिवाजी' असा उल्लेख केल्याने शोच्या मेकर्सवर युजर्स भडकले होते. केबीसीमध्ये स्पर्धकाला विचारण्यात आलेल्या प्रश्नावरून ('इनमें से कौन से शासक मुगल सम्राट औरंगजेब के समकालीन थे ?' या प्रश्नाच्या उत्तरासाठी ऑप्शन होते- 'A- महाराणा प्रताप' 'B- राणा सांगा' 'C- महाराजा रणजीत सिंह' 'D- शिवाजी'...) ट्विटरवरून 'कौन बनेगा करोडपती'च्या मेकर्सनी माफी मागावी, अशी मागणी केली होती. 

आता 'कौन बनेगा करोडपती'चे मेकर्स सिद्धार्थ बासु आणि होस्ट अमिताभ बच्चन यांनी माफी मागितली. बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटरवरून माफी मागितली आहे. त्यांनी लिहिले आहे, 'अपमान करणे, असा उद्देश  नव्हता. जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यांनी यासाठी माफ करावे.' 

वाचा - छत्रपती शिवरायांचा अवमान, केबीसीला विरोध

अमिताभ बच्चन यांच्या या ट्विटवर युजर्स प्रतिक्रिया देत आहेत. 

कोल्हापूर: नवे ४ कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह


काल इटलीला, आज स्पेनला मागे टाकले; भारतात कोरोनाग्रस्तांची विक्रमी वाढ सुरुच!


धुळ्यात आणखी २० रुग्णांची भर


पन्हाळा : गाडीला धडकून जखमी झालेल्या रान मांजराला जीवदान (video)


भाजप नेते कपिल मिश्रांच्या भडकावू भाषणांमुळे दिल्ली हिंसाचाराला प्रोत्साहान : मार्क झुकेरबर्ग


जालन्यात कोरोनाबाधितांची संख्या दोनशेच्या उंबरठ्यावर


'कोळसा खाणींचा योग्य उपयोग केल्यास वीजनिर्मितीची गरज संपूर्ण भागेल'


भारतीय हद्दीत घुसखोरी; चीनच्या आडमुठेपणामुळे चर्चा निष्फळ


रक्तबंबाळ, भुकेने व्याकुळ होऊन चालत घरी गेलेल्या मजुरांसाठी आता 'पायघड्या'


औरंगाबादेत आज झाली ६४ रुग्णांची वाढ