Mon, Nov 20, 2017 17:22होमपेज › Soneri › कंगना-आदित्य वादात सुरजने उचलेले हे पाऊल

कंगना-आदित्य वादात सुरजने उचलेले हे पाऊल

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाईन

अभिनेत्री कंगना राणावत सध्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे बरीच चर्चेत आहे. कंगना आणि आदित्य पंचोली यांच्या वादाचा परिणाम आदित्यच्या मुलांवर देखील होत आहे. म्हणूनच सुरज पांचोलीने ट्विटर अकाऊंट बंद केले आहे.

कंगनाने हृतिक आणि आदित्य पंचोली यांच्यावरील राग एका कार्यक्रमांत बोलून दाखवला होता. यानंतर संपूर्ण बॉलिवूडमध्ये कंगना आणि वादग्रस्त वक्तव्यांचीच चर्चा आहे. आता हा वाद इतका विकोपाला गेलाय की या वादमध्ये हृतिक रोशन आणि आदित्यच्या कुटुंबियांनिदेखील सहभाग घेतला आहे. ऋतिक च्या बाजूने सुझान तर आदित्यच्या बाजून पत्नी व मुलाने बाजू मांडली होती. सुरज पंचोलीला या सर्व प्रकाराचा मनस्ताप झाला व त्याने या वादातून काढता पाय घेत ट्विटर अकाऊंट डिलिट केले आहे.

‘माझी सर्व माध्यमांना विनंती आहे, मला व माझी बहिण सनाला या वादापासून दूर ठेवा,माझा कोणावर राग नाही आणि मला या दलदलीपासून लांबच रहायचे आहे. अशा वादग्रस्त परिस्तिथीपासून मी नेहमीच स्वतःचा बचाव करत आलोय. या वादाबद्दल कोणतीही पोस्ट असेल तर ती मला व सनाला टॅग करून पोस्ट केली जाते,असे सुरजने सांगितले आहे. तसेच या टॅगीगची खरच गरज आहे का ? असा सवालही त्याने विचारला आहे. 

‘करिअरच्या सुरुवातीला आदित्य मला मारहाण करत होता. तसेच मी सनापेक्षा एक वर्षाने लहान आहे,असे असून देखील आदित्यने माझ्यासोबत अशी वागणूक केली’, असे आरोप कंगनाने आदित्यवर केले आहेत. कंगनाचे हे आरोप आदित्यने फेटाळून लावत सनाचे आधार कार्ड पोस्ट केले होते. एकूणच हा वाद मीटण्याची कोणतीच चिन्हे दिसत नाहीत. आता पुढे हा वाद कोणते नवे वळण घेणार हेच पाहणे औत्सुक्याचे ठरेल.