Tue, Oct 24, 2017 16:48होमपेज › Soneri › आलियाचे ‘Leave Me Alone’ अन् ‘ब्रह्मास्त्र’

आलियाचे ‘Leave Me Alone’ अन् ‘ब्रह्मास्त्र’

Published On: Oct 12 2017 2:44PM | Last Updated: Oct 12 2017 2:59PM

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाईन

काही दिवसांपूर्वी आलिया भट्ट काश्मीरमध्ये ‘राझी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त होती. त्यावेळी तिने काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातीलच एक फोटो ‘Leave Me Alone’ अशा कॅप्शनसह आलियाने शेअर केला होता. आता मला एकटी सोडा असं म्हणत आलिया ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाच्या तयारीला लागली आहे. 

 

आलिया ’राझी’ चित्रपटानंतर अयान मुखर्जीच्या ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन आणि रणबीर कपूरही दिसणार आहेत. हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित होणार आहे. याच चित्रपटची माहिती देणारे एक पोस्टर आलियाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. 

It's a beautiful day to leave me alone 🚺

A post shared by Alia ✨⭐️ (@aliaabhatt) on

 

गौरी खानच्या डिझायनर शॉपला बीटाऊनचे अनेक कलाकार भेट देत असतात. अभिनेत्री आलिया भट्टने नुकतेच या शॉपला भेट दिली. आलिया आणि गौरीने सोबत फोटोही काढला आहे. हा फोटोही आलियाने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये दोघीही खूप सुंदर दिसत आहेत. ‘गौरी खानच्या शॉपमधील एक धमाल सायंकाळ’ अशा कॅप्शनसह हा फोटो आलियाने शेअर केला आहे. 

BRAHMĀSTRA ❤️

A post shared by Alia ✨⭐️ (@aliaabhatt) on