Sun, May 26, 2019 14:57होमपेज › Soneri › आलियाचा नादच करायचा नाय! 

आलियाचा नादच करायचा नाय! 

Published On: Jun 13 2018 12:59PM | Last Updated: Jun 13 2018 12:59PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

तरूणाईच्या हृदयावर राज्य करणारी आलिया भट आता ट्विटरवर मोस्ट एंगेजिंग अॅक्ट्रेस बनली आहे. आलिया भट तरूणाईच्या गळ्यातली ताईत बनली आहे. आलियाने आपल्या अभिनय कौशल्‍याने आणि ट्रेंडी लुक्सने सोशल नेटिवर्किंग साईट्सवर सर्वांचे आपल्याकडे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे तर ट्विटरवर ती सध्या ‘मोस्ट एंगेजिंग ॲक्ट्रेस ऑफ बॉलिवूड’ बनली आहे.

dinsta

स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनुसार, आलिया शंभर गुणांसह ‘मोस्ट एंगेजिंग ॲक्ट्रेस ऑन ट्विटर’ बनली आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिलेली आहे. नुकतीच, प्रियांका चोप्रा फेसबुकवर मोस्ट एंगेजिंग सेलिब्रिटी बनल्याने चर्चेचा विषय ठरली होती.

dinsta

स्कोर ट्रेंड्सने दिलेल्या माहितीनुसार, आलिया पहिल्या स्थानी आहे तर ८९ गुणांसह सौंदर्यवती अनुष्का शर्मा ट्विटरवर दूस-या स्थानी आहे. दीपिका पादुकोण ७६ गुणांसह तिस-या स्थानी आहे. श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिस चौथ्या स्थानी तर आंतरराष्ट्रीय आयकॉन प्रियांका चोप्रा ६३ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.
स्कोर ट्रेंड्स इंडियाचे सह-संस्थापक अश्वनी कौल म्‍हणाले, “आलियाचा चित्रपट राजी बॉक्स ऑफिसवर १०० कोटींपेक्षा जास्त बिजनेस करून १०० कोटी क्लबमध्ये पोहोचली. आता ती रणबीर कपूर आणि बिग बींच्यासोबत 'ब्रम्हास्त्र' या चित्रपटात काम करत आहे. मल्टिस्टारर 'कलंक' चित्रपटातही तिची भूमिका पाहायला मिळणार आहे. 

dinsta
धर्मा प्रॉडक्शन्सच्या 'राजी' चित्रपटात आलियाने कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात उत्तम अभिनय केला आहे, अशी प्रशंसा खुद्द तिचे वडिल महेश भट्ट यांनी काढले होते. ‘राजी’ हा चित्रपट हरिंदर सिक्‍का या सेवानिवृत्त लष्करी अधिकार्‍याने लिहिलेल्या ‘कॉलिंग सेहमत’ या पुस्तकावर आधारित आहे.

dinsta