अक्षयकडून बीएमसीला ३ कोटींची मदत

Last Updated: Apr 10 2020 4:05PM
Responsive image


मुंबई : पुढारी ऑनलाईन 

अभिनेता अक्षय कुमारने पीएम केअर्स फंडमध्ये २५ कोटी रुपयांची मदत केली. त्यानंतर आता अक्षयने मुंबई महानगरपालिकेलाही मदत दिली आहे. त्याने बीएमसीला मास्क आणि कोरोना टेस्टिंग किट्ससाठी ३ कोटी रुपयांची मदत केली आहे. रिपोर्सनुसार, अक्षयने ही मदत आरोग्य कर्मचाऱ्यांना चांगले मास्क मिळावा आणि टेस्टिंग किट्ससाठी केली असल्याचे समजते. बीएमसीकडे पीपीई मास्कची कमतरता असल्याची माहिती त्याला मिळाल्यानंतर त्याने ही मदत देऊ केली आहे.

त्याचबरोबर, अभिनेता सलमान खाननेही चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या सोळा हजार कामगारांच्या बँक खात्यात ४ कोटी ८० लाख रुपये जमा केले आहेत.

शाहरुख खानकडूनही मदत

अभिनेता शाहरुख खाननेही बीएमसीला त्याचे चार मजली ऑफीस क्वारंटाईन सेंटर बनवण्यासाठी ऑफर केली आहे. तसेच, शाहरुखने मध्यंतरी ट्विट करून कोरोनाग्रस्तांची मदत करण्याविषयी सांगितले आहे.