Mon, Aug 26, 2019 15:28



होमपेज › Soneri › 'फिल्मोवाली बात नही है' म्हणत जरीनाला केलेलं रिजेक्ट

'फिल्मोवाली बात नही है' म्हणत जरीनाला केलेलं रिजेक्ट

Published On: Jul 17 2019 11:32AM | Last Updated: Jul 17 2019 12:40PM




मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूड अभिनेत्री जरीना वहाब यांचा १७ जुलैला ६३ वा वाढदिवस. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम येथे एका मुस्लिम कुटुंबात झाला. पुणे येथील फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून त्यांनी अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. अभिनेत्री व्हायचे स्वप्न घेऊन त्या स्वप्ननगरी मुंबईत आल्या. येथे येऊन त्यांनी आपल्या करिअरला सुरूवात केली. खूप कमी लोकांना माहिती आहे की,

याआधी जरीना यांना सिनेमासाठी अभिनेते राज कपूर यांनी रिजेक्ट केलं होते. जरीना सिंपल दिसणारी तरूणी होती. त्यामुळे त्यांना रिजेक्ट करण्यात आलं. जरीनाबाबत सांगण्यात आले की, या तरूणीमध्ये ग्लॅमर नाही. राज कपूरच्या मते, तिच्यात फिल्मोवाली बात नव्हती. 

dinsta

जरीना यांच्या जागी जया बच्चनला मिळाला चित्रपट 

ऋषिकेश मुखर्जी यांनी गुड्डी चित्रपटात जरीना वहाब यांच्या जागी अभिनेत्री जया बच्चन यांना घेतलं. तरीही जरीना यांनी हार मानली नाही. त्यांनी स्वत:कडे लक्ष दिलं. आपल्या लुक्सवर खूप लक्ष दिले. त्यांनी हाय सोसायटीतील तरूणींसारखे जीवनशैली, राहणीमान शिकले आणि स्वत:मध्ये बदल केला. 

dinsta

देव आनंद यांनी दिला पहिली ब्रेक

अभिनेते देव आनंद यांनी जरीना वहाब यांना चित्रपटात पहिला ब्रेक दिला. जरीना वहाब यांना 'इश्क इश्क इश्क' हा चित्रपट मिळाला. यानंतर त्यांनी अनेक चित्रपट मिळाले आणि अभिनयाच्या जोरावर त्यांनी स्वत:ला सिध्द केले. आणि  जरीना यांचे नाव बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्रींमध्ये समाविष्ट झाले. 

dinsta

आदित्य पंचोलीशी लग्न 

चित्रपट कलंक का टीकाच्या सेटवर जरीना वहाब यांची भेट अभिनेता आदित्य पंचोलीशी झाली. यानंतर १९८६ मध्ये  दोघांनी लग्न केले. दोघांची दोन मुले सारा आणि सूरज आहेत.  

dinsta

 

View this post on Instagram

The principal shooting of film was spread over 25 days at neighbouring hill stations of Panchgani and Mahabaleshwar in Maharashtra. A bungalow in Panchgani was the setting on Zarina Wahab's home, where many keys scenes, including the songs, like Gori tera gaon bada pyaara were shot.[2][3] The film's title means "Heart Stealer" in Hindi. The film is a Rajshri Productions film produced by Tarachand Barjatya. It is based on a Bengali story, Chittachakor by Subodh Ghosh.[1] K. J. Yesudas and Master Raju won the National Film Awards 1976 for Best Male Playback Singer and Best Child Artist respectively. The film became a box office hit[5] and received several nominations with also winning a couple of awards. This also completed the 'Debut Silver Jubilee Hatrick' for actor Amol Palekar, who had given hits with his debut film, Rajnigandha (1974), followed by Chhoti Si Baat (1975). All three films were directed by Basu Chatterjee, and were all Silver Jubilee hits in Mumbai. . My favourite song of Yesudas ji! Lyrics beautifully writtened and composed by Ravindra Jain💓 . Movie- Chitchor (1976) Song- Gori tera gau bada pyara #ravindrajain #yesudas #amolpalekar #masterraju #zarinawahab #chitchor

A post shared by @ oldbollywoodfan on