Sun, Sep 22, 2019 22:18होमपेज › Soneri › भगव्‍या साडीवर ट्रोल, स्वरा भास्‍करचा चढला स्‍वर 

भगव्‍या साडीवर ट्रोल, स्वरा भास्‍करचा चढला स्‍वर 

Published On: May 21 2019 12:48PM | Last Updated: May 21 2019 12:48PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

सोशल मीडियाचा वापर वाढल्‍याने येथे ट्रोलर्सची काही कमी नाही. प्रत्‍येक मुद्‍द्‍यावर, प्रत्‍येक गोष्‍टीवर कॉमेंट्‍स आणि ट्रोलिंग सुरू आहे. आता अभिनेत्री स्वरा भास्कर काही दिवसांपूर्वी ट्रोल झाली होती. आता या ट्रोलरला स्‍वराने कडक शब्‍दात उत्तर दिले आहे. 

नेहमीच कोणत्‍या ना कोणत्‍या कारणाने चर्चेत राहणारी स्‍वरा भास्‍कर आताही चर्चेत आहे. स्वरा भास्करला चित्रपट दिग्‍दर्शक अशोक पंडितने ट्विटरवर ट्रोल करण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. अशोक पंडित यांनी ट्विटरवर एका वृत्तपत्राचे कात्रण पोस्ट केले. या कात्रणातील फोटोमध्‍ये स्वरा भगव्‍या रंगाची साडी नेसलेली दिसते. 

अशोक पंडित यांच्‍या ट्‍विटचे स्वरा भास्करने सडेतोड उत्तर दिले आहे. अशोक पंडित यांच्‍या ट्‍विटला रिट्विट करत स्‍वराने लिहिले आहे-

'मिस्टर पंडित जितकं आपण डिझर्व नाही करत त्‍यापेक्षा अधिक सन्‍मानाने सांगते की, न आपण आणि ना ही आपले दहशतवादी गोडसेशी प्रेम करणारे मित्र, या भगव्‍या रंगाचे मालक आहेत. आपला द्‍वेष लपवण्‍यासाठी त्‍याचा दुरुपयोग करण्‍याचा कितीही प्रयत्‍न करा. आपण या सत्‍याला समोरे जाऊ शकत नाही. याचा सामना करा.' 

वृत्तपत्रातील या कात्रणाचा वापर अशोक पंडित यांनी स्वराला ट्रोल करण्‍यासाठी केला. तेच वृत्तपत्राचे कात्रण आधीच स्वराने सोशल मीडियावर शेअर केला होता. हे कात्रण एका वृत्तपत्राला दिलेल्‍या मुलाखतीचा भाग होता. 

लोकसभा निवडणुकीच्‍या प्रचारादरम्‍यानही स्वरा भास्‍कर ट्रोल झाली होती. आता या ट्रोलर्सच्‍या यादीमध्‍ये अशोक पंडित यंचेही नाव जोडले गेले आहे. अशोक हे ‘द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या चित्रपटाचे  निर्माते आहेत.