Wed, Mar 20, 2019 22:53होमपेज › Soneri › अभिनेत्री श्री रेड्डीचा आता सचिन तेंडूलकरवर निशाणा 

अभिनेत्री श्री रेड्डीचा आता सचिन तेंडूलकरवर निशाणा 

Published On: Sep 12 2018 4:51PM | Last Updated: Sep 12 2018 4:51PMनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

दाक्षिणात्‍य अभिनेत्री श्री रेड्डी अनेक तेलुगु स्‍टार्सवर कास्‍टिंग काउचचा आरोप लावला होता. त्‍यावेळी ती चांगली चर्चेत आली होती. तेलुगू चित्रपट चेंबरच्‍या समोर टॉपलेस होऊन तिने आपला संताप देखील व्‍यक्‍त केला होता. आता पुन्‍हा ती चर्चेत आली आहे. मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडुलकरवर रेड्‍डीने सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून निशाणा साधलाय. 

रेड्डीने आपल्‍या फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. पोस्‍टमध्‍ये तिने लिहिलयं की, 'एक रोमँटिक व्‍यक्‍ती ज्‍याला सचिन तेंडुलकर म्‍हणतात, जेव्‍हा हैदराबाद आला होता, तेव्‍हा एका चार्मिंग तरुणीने त्‍याच्‍यासोबत रोमान्‍स  केला. हाय प्रोफाईल चामुंडेश्वर स्वामीने त्‍यात मिडल मॅनची भूमिका केली. महान व्‍यक्‍ती उत्तम खेळू शकतो...म्‍हणजे रोमान्‍स करू शकतो????'

श्री रेड्डीने आपल्‍या फेसबुक पोस्टमध्‍ये ज्‍या 'चार्मिंग गर्ल'कडे इशारा केला आहे, ती तेलुगू अभिनेत्री चार्मी कौर असल्‍याचे म्‍हटले जात आहे. यावर अद्‍याप, चार्मी कौर किंवा सचिन तेंडुलकर यांच्‍याकडून कुठल्‍याही प्रतिक्रिया आलेल्‍या नाहीत.