Sun, Oct 21, 2018 12:40होमपेज › Soneri › प्रियांका चोप्राचा नवा मराठी चित्रपट

प्रियांका चोप्राचा नवा मराठी चित्रपट

Published On: May 16 2018 4:57PM | Last Updated: May 16 2018 4:56PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राचा नवा मराठी चित्रपट येणार आहे. ‘पाणी' हा चित्रपट प्रियांका प्रोड्यूस करणार आहे. प्रियांकाने याबद्‍दलची माहिती ट्विटरवरून दिली आहे. आदिनाथ कोठारे या चित्रपटाचे दिग्‍दर्शन करणार आहे. सत्‍य कथेवर आधारित या चित्रपटाची कहाणी आहे. सध्‍यस्‍थितीत महाराष्ट्रात असणारा पाण्‍याचा अभाव मोठ्‍या पडद्‍यावर दाखवले जाणार आहे. 

मोशन पोस्टर रिलीज
प्रियांकाच्‍या प्रोडक्शन हाऊस ‘पर्पल पेबल पिक्चर्स'ने या चित्रपटाचा एक मोशन पोस्टर रिलीज केला आहे. आमचा चौथा मराठी चित्रपट 'पानी'चे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. हे सांगताना आम्‍हाला आनंद होत आहे.