प्रसिध्द अभिनेत्री निम्मी यांचे निधन

Last Updated: Mar 26 2020 9:41AM
Responsive image


मुंबई : पुढारी ऑनलाईन 

प्रसिध्द अभिनेत्री निम्मी यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी मुंबईमध्ये निधन झाले. त्या मागील काही महिन्यांपासून आजारी होत्या. मुंबईतील सरला नर्सिंग होममध्ये त्यांनी अंतिम श्वास घेतला. निम्मी यांनी १६ वर्षे चित्रपटांत काम केले. सन १९४९ ते १९६५ पर्यंत त्या चित्रपट इंडस्ट्रीत सक्रिय राहिल्या. त्यांचे खरे नाव 'नवाब बानो' असे होते. निम्‍मी यांनी एस अली राजा यांच्याशी विवाह केला होता. २००७ मध्ये अली राजा यांचे निधन झाले. 

राज कपूर यांनी दिला होता ब्रेक

निम्मी यांना राज कपूर यांनी आपल्या चित्रपटात पहिला ब्रेक दिला होता. असं म्हटलं जातं की, त्यांनी नवाब बानो यांचे नाव बदलून निम्मी ठेवलं होतं. राज कपूर यांनी आपल्या बरसात या चित्रपटात ब्रेक दिला होता. हा चित्रपट हिट झाल्यानंतर निम्मीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. आन, उडन खटोला, भाई भाई, कुंदन, मेरे महबूब यासारख्या चित्रपटात काम करून लोकप्रियता मिळवली. 

दिलीप कुमार ते राज कपूर, अशोक कुमार, धर्मेंद्र यासारखे अनेक दिग्गज स्टार त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक होते. निम्मी यांचे निधन झाल्यानंतर दिग्दर्शक महेश भट्ट यांनी देखील ट्विट करून आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली.

सांगली : वारणावतीत गव्यांचा, तर अंबाईवाडीत बिबट्यांचा मुक्तसंचार!


कोल्हापुरात आणखी ३ कोरोनाग्रस्तांची भर 


अखेर ठरलं! जयललितांच्या अब्जावधीच्या संपत्तीचे 'हे' असणार वारसदार


इंग्लंडमधील 'बायो सेक्युअर' कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिजची संमती!


पुणे : पॅरोल रजेवर सुटलेल्या कैद्याच्या स्वागत रॅलीत पोलिसच सहभागी!


महाराष्ट्र पोलिसांना ‘वंदे मातरम’द्वारे मानाचा मुजरा (Video)


सुरक्षा दलांनी केला दोन दहशतवाद्यांचा खातमा 


'कहीं दूर जब दिन ढल जाए' सारखी अजरामर गीते रचणारे योगेश काळाच्या पडद्याआड


ज्येष्ठ सिने पत्रकार आणि लेखिका ललिता ताम्हणे यांचे निधन


देशातील कोरोना उद्रेक सुरुच; बाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ!