मुंबई : पुढारी ऑनलाईन
बॉलिवूड अभिनेत्री कोयना मित्राला एक मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेटच्या कोर्टाने चेक बाउन्सप्रकरणी ६ महिन्यांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली. इतकेच नाही तर कोर्टाने तक्रारदाराला व्याजासहित ४ लाख ६४ हजार रूपये देण्याचे आदेश दिले आहेत. कोयनाला हे पैसे मॉडल पूनम शेट्टीला द्यायचे आहेत. पूनमने २०१३ मध्ये कोयनाच्या विरोधात चेक बाउन्स झाल्यानंतर केस दाखल केली होती. कोयनाने हे आरोप फेटाळले होते.
हे प्रकरण २०१३ चे आहे. पूनम सेठीने कोयना मित्राच्या विरोधात चेक बाउन्सची केस दाखल केली होती. सेठीचे म्हणणे होते की, कोयनाने आपली गरज सांगून तिच्याकडून २२ लाख रुपये उधार घेतले होते. ते पैसे परत करण्यासाठी कोयनाने पूनमला ३ लाख रुपयांचा एक चेक दिला तो बाउन्स झाला होता. चेक बाउन्स झाल्यानंतर पूनम सेठीने केस केली होती.