Sun, Jul 12, 2020 20:41होमपेज › Soneri › जेव्हा कॅटला पहिल्याच चित्रपटातून बाहेर काढलं...

जेव्हा कॅटला पहिल्याच चित्रपटातून बाहेर काढलं...

Published On: Jul 16 2019 12:47PM | Last Updated: Jul 16 2019 12:47PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूड अभिनेत्री कॅटरीना कैफचा १६ जुलैला ३६ वा वाढदिवस. कॅटरीना कैफ बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक मोठ्या आणि यशस्वी अभिनेत्रींमध्ये होते. तिच्या वाढदिवसाच्या औचित्याने कॅटरीनाच्या आयुष्यातील एक खास किस्सा आणि बऱ्याच इंटरेस्टींग गोष्टी जाणून घ्यायला तुम्हाला नक्की आवडेल. 

dinsta

कॅटरीना-सलमान चांगले मित्र आहेत. दोघांची जोडीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. काही दिवसांपूर्वी दोघांचा भारत हा चित्रपट रिलीज झाला होता. भारतमधील दोघांची जोडी पसंतीसही उतरली. 

dinsta

दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. यामध्ये युवराज, एक था टायगर, मैंने प्यार क्यों किया, टायगर जिंदा है यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे. कॅटने सिनेइंडस्ट्रीत पाऊल ठेवल्यापासून सलमान आणि कॅटरीनाची मैत्री आहे. 

dinsta

फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीत कॅटने एक खास किस्सा शेअर केला होता. तिने सांगितले की, ती एकदा खूपच चिंतेत होती आणि रडत सलमानकडे गेली. तिला रडताना पाहून सलमान हसू लागला. खरं म्हणजे, कॅट कैफ अनुराग बसु यांच्या चित्रपट सायामधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार होती. सायामध्ये जॉन अब्राहम एका भुताच्या भूमिकेत दिसणार होता. 

dinsta

दोन दिवसाच्या शूटिंगनंतर कॅटला सांगण्यात आले की, तिला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. हे ऐकताच कॅट रडू लागली. सलमानला भेटली आणि रडू लागली. सलमानने तिला समजावलं की या सर्व गोष्टी महत्त्वाच्या ठरत नाहीत. त्यामुळे तिला कामावर लक्ष देण्याचा सल्ला दिल. कॅट म्हणाली, 'सलमानला नेहमीच माझ्यावर विश्वास होता.'

dinsta

कॅट म्हणाली, 'मी सलमानसमोर रडत होते. आणि सलमान हसायचा. मला वाटायचा की तो स्वार्थी आहे. मला वाटायचे की, आता माझे करिअर संपले आहे. मला पहिल्याच चित्रपटातून बाहेर करण्यात आले होते. हा माझ्या आयुष्याचा अंत आहे आणि हा हसत आहे? त्यानंतर त्याने मला शांत करत सांगितले की, तू समजून घे, या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत. मला माहिती आहे की, तू यशस्वी होशील. फक्त कष्ट कर आणि कामावर फोकस कर.'

dinsta

कॅटने २००३ मध्ये बूम या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ‍ठेवले होते. आता ती अक्षय कुमारसोबत सूर्यवंशी चित्रपटात दिसणार आहे. 

dinsta