Sun, Jul 12, 2020 18:12होमपेज › Soneri › 'ठग्‍ज'चा फटका; दीपिकाचा 'महाभारता'स नकार

'ठग्‍ज'चा फटका; दीपिकाचा 'महाभारता'स नकार

Published On: Dec 07 2018 3:11PM | Last Updated: Dec 07 2018 3:15PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

'ठग्स ऑफ हिंदोस्तान' हा चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर सटकून आपटला. चित्रपटात आमिर खानसोबत बिग बी अमिताभ बच्‍चन, कॅटरिना कैफ यासारखे बडे स्‍टार्स असताना देखील हा चित्रपट प्रेक्षकांच्‍या पसंतीस उतरला नाही. आता या चित्रपटानंतर बहुप्रतीक्षीत वेब सीरिज 'महाभारत'साठी आमिर खान मेहतन घेत आहे. या चित्रपटासाठी मुख्‍य नायिका म्‍हणून आमिर खानने दीपिकाला निवडले होते. परंतु, खुद्‍द दीपिकाने या चित्रपटात काम करण्‍यासाठी नकार दिल्‍याचे वृत्त आहे. 

मध्‍यंतरी, आमिर खान 'महाभारत'वर ८ भागांची वेबसीरिज आणणार आहे. चित्रपटात द्रौपदीच्‍या भूमिकेसाठी दीपिकाला निवडलं होतं. या सीरिजमध्‍ये दीपिका काम करणार असल्‍याची चर्चा देखील मध्‍यंतरी होती. परंतु, आता दीपिका या सीरिजमध्‍ये काम करणार नसल्‍याची माहिती समोर आली आहे. 

अधिक वाचा : महाभारतात आमिरला द्रौपदी म्‍हणून 'ही' हवीय अभिनेत्री

सूत्रांच्‍या माहितीनुसार, या प्रोजेक्‍टबाबात, दीपिका आमिर खानच्‍या घरी गेली होती. त्‍यानंतर, असे कयास लावले जात होते की, ती या प्रोजेक्ट हिस्सा असेल. दीपिका मिस्टर परफेक्शनिस्टच्‍या या वेबसीरिजमध्‍ये काम करेल, असे अनेकांना वाटत होते. परंतु, तसे झाले नाही. सोशल मीडियावर या वृत्ताबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. एकतर आमिरचा नुकताच येऊन गेलेला चित्रपट 'ठग्‍ज ऑफ हिंदोस्‍तान' मोठ्‍या पडद्‍यावर कमाल दाखवू शकला नाही. याचाच परिणाम म्‍हणून कदाचित दीपिकाने ही वेबसीरिज करण्‍यास नकार दिला असावा, असे म्‍हटले जात आहे. 

दीपिका आणि आमिर खानसोबत काम केलेलं नाही. दीपिकाला आमिरसोबत काम करण्‍याची संधी मिळत असतानाही नकार दिल्‍याने अनेकांना आश्‍चर्य वाटत आहे.