Sun, Oct 20, 2019 11:51होमपेज › Soneri › 'सत्ते पे सत्ता'च्या रिमेकमध्ये दिसणार 'ही' जोडी

'सत्ते पे सत्ता'च्या रिमेकमध्ये दिसणार 'ही' जोडी

Published On: Jul 10 2019 7:00PM | Last Updated: Jul 10 2019 6:10PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

बॉलिवूड अभिनेता, 'बीग बी' अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांच्या 'सत्ते पे सत्ता' या चित्रपटाचा रिमेक लवकरच येत आहे. या चित्रपटाची निर्मिती रोहित शेट्टी आणि फराह खान दोघेजण मिळून करणार आहेत. तर काही दिवसांपुर्वी या चित्रपटासाठी शाहरुख खान आणि कॅटरीना कैफला घेतले असल्याचे वृत्त होते. परंतु सध्या 'सत्ते पे सत्ता' च्या रिमेकमध्ये हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोणला साईन केले गेले आहे.           

दीपिका आणि हृतिकने एकत्र काम करण्याची ईच्छा व्यक्त केली होती. परंतु त्यांना कोणत्याच चित्रपटात एकत्र भूमिका साकारायला मिळालेली नाही. तर सध्या दोघांना एकत्र काम करण्याची संधी 'सत्ते पे सत्ता' या चित्रपटापासून मिळाली आहे. 

Image result for hrithik roshan

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांची भूमिका हृतिक आणि हेमा मालिनीची भूमिका दीपिका या चित्रपटात साकारणार आहे. यासाठी दोघांनी साईन ही केले आहे. 

Image result for deepika padukone

रिपोर्टच्या माहितीनुसार, रोहित शेट्टी आणि फराह खान यांना वाटते की, हृतिक आणि दीपिका या भूमिकेसाठी अगदी परिपूर्ण आहेत. तसेच ही जोडी हिट होईल. फराह खानने या चित्रपटाची कहाणी दीपिकाला सांगितली तेव्हा तिला ही कहाणी फारच आवडली आणि लगेच तिने या चित्रपटासाठी होकार दिला. 

Related image

दीपिकाचा फराह खानसोबत 'सत्ते पे सत्ता'चा रिमेक हा तिसरा चित्रपट आहे. याशिवाय दीपिका कबीर खान यांच्या '८३' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात माजी क्रिकेटर कपिल देवची भूमिका रणवीर सिंह साकारत आहेत.      
Related image