Tue, Mar 26, 2019 09:42होमपेज › Soneri › वरुण धवनच्या 'ऑक्टोबर'चा ट्रेलर रिलीज

वरुण धवनच्या 'ऑक्टोबर'चा ट्रेलर रिलीज

Published On: Mar 12 2018 7:58PM | Last Updated: Mar 12 2018 7:58PMमुंबई 

बॉलिवूड अभिनेता वरुण धवनच्या आगामी 'ऑक्टोबर' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. २ मिनिट २३ सेकंद असलेल्या या ट्रेलरमध्ये वरुणची भूमिका त्याच्या आधीच्या भूमिकेपेक्षा फारच वेगळी असल्‍याचे दिसत आहे.  

वरूणच्या ‘ऑक्‍टोबर’मधून २० वर्षीय मॉडेल बानीता संधू आपल्‍या बॉलिवूड करिअरला सुरुवात करत आहे. ‘ऑक्‍टोबर’च्या ट्रेलरमध्ये  बरीच गोंधळलेली परिस्‍थिती आहे. हा सिनेमा एक लव्ह सोटी नसून, एका प्रेमाच्या कहाणीवर आधारीत आहे. एका सीनमध्ये वरून माशा मारताना दिसत आहे. 

'ऑक्टोबर' सिनेमाचे  दिग्दर्शक शूजित सरकार आहेत. येत्या १३ एप्रिल रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. चित्रपटातील ट्रेलरच्या सुरुवातीलाच वरुण धवन हॉटेलमधील वेटरच्या भूमिकेत दिसतोय. 
ट्रेलरमध्ये वरुण आणि बानीता यांच्यामध्ये कोणत्‍याही प्रकारचे प्रेम दाखलेले नाही. वरुण एक सुंदर आणि खोडकर मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे.