Thu, Aug 22, 2019 14:35होमपेज › Soneri › 'बिग बॉस' फेम राहुल देवच्‍या वडिलांचे निधन 

'बिग बॉस' फेम राहुल देवच्‍या वडिलांचे निधन 

Published On: Apr 22 2019 3:28PM | Last Updated: Apr 22 2019 3:28PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

टीव्‍ही जगतातील प्रसिध्‍द कलाकार आणि बॉलिवूड अभिनेता राहुल देव यांच्‍या वडिलांचे निधन झाले आहे. राहुल देव यांचे वडील ९१ वर्षांचे होते. अभिनेते मुकुल देव यांचे भाऊ राहुलने ट्‍विट करून ही माहिती दिली आहे. राहुलने आपल्‍या वडिलांचा एक फोटो शेअर करत इमोशनल पोस्‍टही लिहिली आहे. 

राहुलने ट्‍विटमध्‍ये म्‍हटले आहे, 'आपली नेहमीच आठवण येईल पापा. पाच दिवसांपूर्वी ९१ वर्षांचे ते आम्‍हाला सोडून गेले. शानदार ९० च्‍या वयात त्‍यांच्‍यासोबत घालवलेले क्षण.' 

राहुलने सांगितले की, त्‍याचे वडील एक पोलिस ऑफिसर होते. आणि त्‍यांना अनेक पुरस्कारांनी सन्‍मानित करण्‍यात आले होते. ते एक सामान्‍य आणि दयाळू व्‍यक्‍ती होते. स्‍वत:ला धन्य समजतो की, मी त्‍यांचा मुलगा आहे.'

राहुल देवने सन २००० मध्‍ये रिलीज झालेला चित्रपट 'चॅम्पियन'मधून आपल्‍या करिअरची सुरुवात केली होती. त्‍याने 'अशोका', 'ओमकारा', 'ढिशूम' आणि 'मुबारकां' या चित्रपटातही काम केले आहे. हिंदीबराबेरच तो बंगाली, कन्नड, मल्‍याळम, पंजाबी, तमिळ आणि तेलुगू चित्रपटांत काम केले आहे.