Tue, Oct 24, 2017 16:59
29°C
  Breaking News  

होमपेज › Soneri › अर्जुन रामपालचा 'डॅडी' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित 

अर्जुन रामपालचा 'डॅडी' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित 

By | Publish Date: Jul 21 2017 1:50PM

मुंबई : पुढारी ऑनलाईन

अर्जुन रामपालचा आगामी चित्रपट 'डॅडी'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अर्जुन वेगळ्या लुकमध्‍ये दिसत आहे. 'डॅडी'मध्‍ये अर्जुन 'मुंबईचा डॅडी' म्‍हणजेच अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्‍या भूमिकेत आहे. 

४४ वर्षीय अर्जुन रामपालने अरुण गवळीची भूमिका साकारण्‍यासाठी बरीच मेहनत घेतली आहे. 'डॅडी' चित्रपटाच्‍या ट्रेलरची सुरुवात ब्‍लॅक ॲण्‍ड व्‍हाईट सीन्‍सने सुरु होते. ट्रेलरमध्‍ये १९७० च्‍या मुंबई अंडरवर्ल्डची दुनिया स्‍क्रीनवर पुन्‍हा रिक्रिएट केली आहे. 

गँगस्‍टरच्‍या अर्जुनचा मराठी बोलण्‍याचा अंदाज, त्‍याचे कपडे एकदम परफेक्‍ट आहे. 'मैं भगोडा नही है, अपना देश छोडकर नहीं भागेगा' असे एका सीनमध्‍ये अर्जुन म्‍हणताना दिसतो.  

काही दिवसांपुर्वी या चित्रपटाचे पोस्‍टर प्रदर्शित करण्‍यात आले होते. असीम आहलुवालियाने 'डॅडी'चे दिग्‍दर्शन केले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर अुर्जनने आपल्‍या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केले आहेत. चित्रपटात फरहान अख्तर आणि ऐश्वर्या राजेश यांच्‍या मुख्य भूमिका आहेत. ऐश्वर्या चित्रपटात अर्जुनच्‍या पत्नीच्‍या भूमिकेत आहे.