होमपेज › Soneri › बाबा रामदेव बायोपिक : अजय देवगणची निर्मिती 

बाबा रामदेव बायोपिक : अजय देवगणची निर्मिती 

By | Publish Date: Jul 21 2017 1:50PM

मुंबई : पुढारी ऑनलाईन

'सिंघम'अभिनेता अजय देवगण चित्रपट निर्माते अभिनव शुक्ला यांच्‍यासमवेत मिळून योग गुरु बाबा रामदेव यांच्‍यावर बायोपिकची निर्मिती करणार आहेत. 

एका वृत्तानुसार, हे बायोपिक असून एक टी. व्‍ही. शो असणार आहे.  'स्वामी बाबा रामदेव: द अनटोल्ड स्टोरी' असे बायोपिकचे नाव आहे. या बायोपिकमध्‍ये बाबा रामदेव यांचे पार्टनर बालकृष्ण यांच्‍या आयुष्‍याशी संबंधित काही गोष्‍टी, घटनाही पाहायला मिळणार आहेत. या सीरीजची शूटिंग या वर्षाअखेरपर्यंत सुरू होईल.