Thu, Mar 21, 2019 09:02होमपेज › Soneri › आमिर खान साकारणार 'ओशो'?

आमिर खान साकारणार 'ओशो'?

Published On: Jul 12 2018 4:01PM | Last Updated: Jul 12 2018 4:03PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

मिस्‍टर परफेक्‍टनिस्‍ट आमिर खान आणि करण जौहरने कधीही एकत्र काम केलेले नाही. आता हे दोघे लवकरच एका चित्रपटात  दिसणार आहे. हा चित्रपट ओशोच्‍या जीवनावर आधारित असणार आहे. सूत्रांच्‍या माहितीनुसार, ओशोच्‍या बायोपिकसाठी आमिर खानला साईन करण्‍यात आले आहे. 

याआधी आमिरने गीता फोगाटचा बायोपिक 'दंगल'मध्‍ये काम केलं आहे. एका वेबसाईटच्‍या माहितीनुसार, ओशोच्‍या बायोपिकमध्‍ये आमिर काम करणार असून या चित्रपटाला करण जोहरचे धर्मा प्रोडक्शन आणि आमिर खानचे प्रोडक्शन हाऊस एकत्र मिळून प्रोड्यूस करणार आहे. 

या चित्रपटाला शकुन बत्रा दिग्‍दर्शित करणार आहेत. शकुन यांनी याआधी 'कपूर एंड सन्स' चित्रपट दिग्‍दर्शित केला आहे.

Related image

सूत्रांच्‍या हवाल्‍याने वेबसाईटने म्‍हटलयं की, 'आमिर खान खूप उत्‍साहित आहे की, त्‍याच्‍याजवळ स्क्रिप्ट आली आहे. त्‍याने या चित्रपटासाठी होकार दिला आहे. आणि तो लवकरच तयारी करणार आहे. 

सूत्रांच्‍या माहितीनुसार, 'एकाच इंडस्ट्री असूनही करण आणि आमिरने एकत्र कधीही काम केलेले नाही.' आमिरच्‍या 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'च्‍या चित्रपटानंतर ओशो बायोपिकची घोषणा होण्‍याची शक्‍यता आहे.