Thu, Mar 21, 2019 09:19होमपेज › Soneri › ... आणि 'ठग्‍ज'ने ठगावले 

... आणि 'ठग्‍ज'ने ठगावले 

Published On: Nov 09 2018 5:08PM | Last Updated: Nov 09 2018 5:08PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

बहुचर्चित आमिर खानचा चित्रपट 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' रिलीज झाला आहे. आमिर खान, अमिताभ बच्चन, फातिमा सना शेख आणि कॅटरीना कैफ स्टारर चित्रपटात आमिर आणि अमिताभ बच्‍चन यांनी पहिल्‍यांदाच एकत्र काम केलं आहे. परंतु, या चित्रपटाला सोशल मीडियावरून मिळालेल्‍या कॉमेंटवरून या चित्रपटाने सिनेरसिकांची निराशा केल्‍याचे चित्र आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्‍विट करून या चित्रपटाला 'निराशाजनक' म्‍हटलं आहे. या चित्रपटाला त्‍यांनी केवळ दोन रेटिंग दिल्‍या आहेत. त्‍याचबरोबर समीक्षक सुमित कादेल यांच्‍यानुसार, 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान'ची जादू चालली नाही. सुमित यांनी म्‍हटलं आहे की, 'वेस्‍ट ऑफ मनी.' 

चित्रपटाची कथा सत्‍य घटनेवर आधारित आहे. 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान ठग' अमीर अली आणि त्‍याचे वडिल इस्माईलच्‍या कहाणीवर आधारित आहे. ते जलौन येथे वास्‍तव्‍यास येतात आणि इंग्रजांसाठी एक दहशत म्‍हणून अमिताभ बच्चन समोर आले. चित्रपटात त्‍यांचं नाव खुदाबख्श (आजाद) असं आहे. 

रिलीज होण्‍यापूर्वी या चित्रपटाबद्‍दल सिनेरसिकांना उत्‍सुकता लागून राहिली होती. आमिर खान देखील एक्सायटेड होता. त्‍यांने अमिताभ बच्चन यांच्‍यासोबत काम करण्‍याबद्‍दल म्‍हटलं होतं, हे सर्व त्‍यांच्‍यासाठी एका स्‍वप्‍नाप्रमाणे आहे. आमिरला खूप आधीपासून अमिताभ यांच्‍यासोबत काम करण्‍याची इच्‍छा होती. आता ही इच्‍छा पूर्ण झालीय.