Sat, Mar 23, 2019 00:14होमपेज › Soneri › अजय देवगनची 'तानाजी'तून होणार दमदार एंट्री 

अजय देवगनची 'तानाजी'तून होणार दमदार एंट्री 

Published On: Jul 12 2018 7:06PM | Last Updated: Jul 12 2018 7:08PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

अभिनेता अजय देवगनने २०१७ मध्‍ये चित्रपट 'तानाजी' ची घोषणा केली होती. सोबत एक पोस्टरदेखील रिलीज केला होता. परंतु, अजय दुसर्‍या प्रोजेक्‍टमध्‍ये बिझी राहिला. २०१८ मध्‍ये 'रेड,' 'टोटल धमाल' आणि 'लव्‍ह रंजन' या चित्रपटांशिवाय, अजय देवगनने आणखी एक चित्रपट लॉक केला आहे. 

Related image

'तानाजी' चित्रपटातून अजय देवगन आणि काजोल तब्‍बल ८ वर्षांनंतर एकत्र मोठ्‍या पडद्‍यावर दिसणार आहे. चित्रपटात कोण-कोण कलाकार असणार यावर काम सुरू असल्‍याचे म्‍हटले जात आहे. रिपोर्ट्सच्‍या माहितीनुसार, या चित्रपटाबद्‍दल अद्‍याप अधिकृतपणे घोषणा करण्‍यात आली नाही. चित्रपटाचे शूटिंग सप्‍टेंबरला सुरू होणार आहे. चित्रपटातील इतर स्‍टार कास्‍टची नावे लवकरच घोषित करण्‍यात येणार आहेत. हा बिग बजेट चित्रपट असून २०१९ मध्‍ये दसरा किंवा दिवाळीत रिलीज होईल, असे म्‍हटले जात आहे. या चित्रपटाचे दिग्‍दर्शन ओम राऊत करत आहेत. 'तानाजी' हा चित्रपट मराठा योद्धा तानाजी मालुसरे यांचा बायोपिक असणार आहे. 

चित्रपट ३ डी मध्‍ये येणार?   
रिपोर्टनुसार, अजय देवगन हा बायोपिक 3D मध्‍ये आणणार आहे. तसे झाल्‍यास अजय देवगनचा हा पहिला 3D चित्रपट असेल.