Tue, Oct 24, 2017 16:52होमपेज › Soneri › चित्रपटांनीही सोडवली ‘आरुषी-हेमराज’ मर्डर मिस्‍ट्री

चित्रपटांनीही सोडवली ‘आरुषी-हेमराज’ मर्डर मिस्‍ट्री

Published On: Oct 13 2017 5:31PM | Last Updated: Oct 13 2017 5:31PM

बुकमार्क करा

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये प्रत्यक्षात घडलेल्या घटनांवर अनेक चित्रपटांची निर्मिती झाली आहे. अशा चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळतो. आरुषी हत्याकांडावर बॉलिवूडकरांचेही लक्ष वेधले होते. सध्या आरूषी प्रकरणाची सर्वत्रच चर्चा सुरू आहे. या प्रकरणावर ‘रहस्य’ आणि ‘तलवार’ दोन चित्रपट बनवण्यात आले आहेत.या हत्याकांडातील रहस्य सोडवण्याचा  चित्रपटांनीही प्रयत्न केला.  

‘आरुषी-हेमराज’ हत्याकांडावर या दोन चित्रपटांसह तिसराही चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र त्याला यश आले नाही. 

‘आरुषी-हेमराज’ हत्याकांडावर दिग्दर्शक मनीष गुप्ता यांनी‘रहस्य’ हा चित्रपट काढला होता. या चित्रपटात  १८ वर्षीय आयेशा महाजनची (आरुषी) कथा पडद्यावर मांडली होती. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सीबीआय ऑफिसरची भूमिका ‘केके मेनन’ यांनी साकारली होती. आयेशाची भूमिका साक्षी सेमने तर आईवडिलांच्या भूमिकेत आशिष विद्यार्थी आणि टिस्का चोप्रा होते. 

याच प्रकरणाशी संबंधित ‘तलवार’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले होते. या चित्रपटाचे कथानक विशाल भारद्वाज यांनी लिहिले होते. तलवारमध्ये आरूषीच्या आई-वडिलांची भूमिका नीरज कबी आणि कोंकणा सेन यांनी साकारली होती. 

काय आहे प्रकरण  

आरुषी तलवार या १४ वर्षीय तरूणीची २००८मध्ये गळा चिरून हत्या करण्यात आली होती. आरुषी सोबतच त्यांचा नोकर हेमराजचा देखील खून करण्यात आला होता.

न्यायालयाचा निकाल

देशातील बहूचर्चित ‘आरुषी-हेमराज’ हत्याकांडातील दोषी ठरवण्यात आलेले आरुषीचे आई-वडील राजेश व नूपुर तलवार यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. गाझियाबादच्या विशेष सीबीआय न्यायालयाने २५ नोव्हेंबर २०१३ रोजी दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तर अलाहाबाद उच्च न्यायालयाने गुरुवारी त्यांची सबळ पुराव्या अभावी सुटका केली.