Tue, Jul 07, 2020 08:58होमपेज › Soneri › आमिर खानचे सलमानच्या पावलावर पाऊल

आमिर खानचे सलमानच्या पावलावर पाऊल

Published On: Jul 19 2019 6:47PM | Last Updated: Jul 19 2019 6:39PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

बॉलिवूड अभिनेता आमिर खान आगामी ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाच्या शूटिंगच्या तयारीत व्यस्त आहे. विशेष म्हणजे, आमिर खानने स्वत: आपल्या वाढदिवसानिमित्त या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाच्या निर्मात्यांकडून एक इंटेस्टेस्टिंग वृत्त समोर आले आहे.  रिपोर्टनुसार, या चित्रपटात आमिर आणि करीना दोघेजण वेगवेगळ्या चार ते पाच लूक्समध्ये दिसणार आहेत.

‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन आणि आमिर खानने अनेक लूक्सवर रिसर्च केले आहे. या चित्रपटात आमिरचे वेगवेगळे चार ते पाच लूक दिसणार आहेत. यातील प्रत्येक आउटफिट आणि कल्चरवर निर्मात्यांनी विशेष लक्ष दिले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाच्या पहिल्या टप्प्याच्या शूटिंगमधील लूकची चाचणीदेखील पूर्ण झाली आहे.  

सूत्रांच्या माहितीनुसार, या चित्रपटाचे शूटिंग ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होणार आहे. परंतु, याची अधिकृत माहिती मिळालेली नाही. ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट हॉलिवूड ‘फॉरेस्ट गंप’ या चित्रपटाचा रिमेक आहे.  

(photo : _aamirkhan instagram वरून साभार)