Tue, Jan 21, 2020 10:37होमपेज › Soneri › ‘उरी’ राज्यभर मोफत दाखवा

‘उरी’ राज्यभर मोफत दाखवा

Published On: Jul 24 2019 11:37AM | Last Updated: Jul 24 2019 3:48PM

कारगिल विजय दिवस निमित्त ‘उरी’ पुन्हा रिलीज होणारमुंबई : पुढारी ऑनलाईन 

विक्की कौशलचा सुपरहिट चित्रपट ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ ६ महिन्यानंतर पुन्हा एकदा रिलीज होणार आहे. २६ जुलैला कारगिल विजय दिवसच्या औचित्याने हा चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, जवळपास ५०० थिएटर्समध्ये हा चित्रपट पुन्हा एकदा दाखवला जाणार आहे.

वाचा : 'उरी' चित्रपटातील 'या' अभिनेत्‍याचे निधन

‘उरी’ राज्यभर मोफत दाखवण्यात यावा, याबाबत माजी सैनिक कल्याणमंत्री संभाजी पाटील निलंगेकरांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. २६ जुलैला सकाळी १० वाजता राज्यभरातील ४५० चित्रपटगृहांमध्ये १८ ते २५ वयोगटातील तरूणांसाठी ‘उरी’चे मोफत प्रक्षेपण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.  

‘उरी’ ११ जानेवारीला रिलीज झाला होता. या चित्रपटाचे यश पाहता निर्मात्यांनी ‘उरी’ पुन्हा रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. 

वाचा : 'उरी' ने तोडले 'बाहुबली२' चे रेकॉर्ड

असे खूप कमी चित्रपट असतात, जे रिलीज झाल्यानंतरही अनेक महिने बॉक्स ऑफिसवर चालतात. विक्कीच्या उरीलादेखील असेच यश मिळाले. उरीने २५० कोटींहून अधिक कमाई करून रेकॉर्ड केले होते. 
भारतीय लष्‍कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारित ‘उरी’ हा चित्रपट आहे. 

वाचा : सर्वांना मागे टाकत ‘उरी’च्या विकी कौशलची बाजी