Tue, Mar 26, 2019 10:03होमपेज › Soneri › ‘बागी-२’ सोडून टायगरने केले मराठी सिनेमाचे प्रमोशन

‘बागी-२’ सोडून टायगरने केले मराठी सिनेमाचे प्रमोशन

Published On: Mar 13 2018 6:10PM | Last Updated: Mar 13 2018 6:10PMमुंबई: पुढारी ऑनलाईन 

बॉलीवूड स्टार टायगर श्रॉफने मैत्रीचा एक वेगळाच वस्तुपाठ सिनेविश्वासाठी घालून दिला आहे. केवळ बॉलीवूडच नाही तर अवघ्या सिनेसृष्टीतील प्रत्येक कलाकार स्वत:च्या सिनेमाच्या प्रमोशनच्या बाबतीत कमालीचा सजग असतो. पण टायगर स्वत:च्या ‘बागी-२’ या सिनेमाच्या ऐवजी त्याच तारखेला प्रदर्शित होणाऱ्या एका मराठी सिनेमाचे प्रमोशन करतोय. 

Image may contain: 6 people, people smiling, people standing

येत्या ३० मार्चला टायगर श्रॉफचा ‘बागी-२’ आणि मराठीत आर.बी. प्रोडक्शन निर्मित ‘गावठी’ हा चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत आहेत. खरंतर दोन्ही भिन्न भाषेतील आणि प्रकाराचे चित्रपट असले तरी एकाच दिवशी प्रदर्शित होणाऱ्या ह्या चित्रपटांमध्ये महाराष्ट्रात तरी सिनेमागृह आणि प्रेक्षक मिळविण्यासाठी स्पर्धा नक्कीच आहे. या सिनेमाचा दिग्दर्शक आनंद कुमार उर्फ अॅण्डीने केले आहे. अॅण्डी नृत्य दिग्दर्शक रेमो डीसोजा यांचा सहायक असून 'फ्लाईंग जाट' या चित्रपटात टायगरला डान्सस्टेप तसेच सीन समजावून सांगण्याचे काम त्यानेच केले होते. त्यानंतरही टायगरने अॅण्डीशी मैत्री कायम ठेवली होती आणि आता त्याच मैत्रीसाठी तो मराठी चित्रपटाचे प्रमोशन करत आहे.  

Image may contain: 4 people, people smiling, people standing, beard and text

मुंबईत 6 मार्च रोजी एका सोहळ्यात टायगर श्रॉफ आणि प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक बॉस्को यांच्या हस्ते ‘गावठी’ या चित्रपटाच्या ट्रेलर आणि दुसऱ्या गाण्याचे संगीत प्रकाशीत झाले. इतकेच नव्हे तर टायगर ने आणि बॉस्को ‘भन्नाट’ या धडाकेबाज आयटम साँगवर अॅण्डीसोबत मनसोक्त थिरकले.

‘बागी-२’ आणि ‘गावठी’ एकाच दिवशी प्रदर्शित होत असले तरीही मी ‘गावठी’ नक्कीच पाहणार असल्याचे टायगरने सांगितले. येत्या ३० मार्च रोजी ‘गावठी’ चित्रपट महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे.

Image may contain: 3 people, people smiling, people standing, beard, hat and outdoor