Tue, Apr 23, 2019 06:12होमपेज › Soneri › ‘तमन्ना’ वेब सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

‘तमन्ना’ वेब सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Published On: Sep 12 2018 3:48PM | Last Updated: Sep 12 2018 3:48PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

मोदक मोशन पिक्चर्स प्रस्तुत आणि  दीपिका श्रीवास्तव निर्मित आणि लकी शेख दिग्दर्शित तमन्ना ही वेब सीरिज अलीकडे पुणे येथे चित्रीत करण्यात आली आहे. ऑक्टोबर २०१८ च्या अखेरीस ही वेब सीरीज रिलीज करण्यात येईल. तमन्ना या वेब सिरीजमध्ये एका जिद्दी मुलीबद्दल आणि तिच्या आयुष्याबद्दल ही सीरिज भाष्य करते. तमन्नाला तिची परिस्थिती तिच्या व्यवसायात सशक्त बनवू शकते? तिची सकारात्मक वृत्ती आणि प्रचंड आत्मविश्वासामुळे तिला आयुष्याची उज्ज्वल बाजू पाहण्यासाठी अंधाऱ्या अवस्थेतून ती बाहेर येईल? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ही सीरिज पाहिल्‍यानंतरच मिळतील. समाजात यशाची उंची गाठणाऱ्या अनेक स्त्रियांसाठी ही सीरिज प्रेरणादायी ठरेल. 

या सिरीजमध्ये अभिमन्यू काक आणि अनन्या डे यांची मुख्य भूमिका आहे. अभिमन्यूने आरजे म्हणून काम केलं आहे. तो वयाच्या १६ व्या वर्षी सर्वांत लहान वयात आरजे झाला होता. अनन्या डे ही एक बंगाली अभिनेत्री आहे. क्रिएटिव्ह हेड अजित घोरपडे, मार्केटिंग आकर्षण कटीयार हे पाहत आहेत. देवांश हा दिल्लीचा एक प्रसिद्ध डीजे आहे आणि मुंबई संगीत महोत्सव २०१७ त्याने तो जिंकला आहे.