Sun, Jul 21, 2019 16:53
    ब्रेकिंग    होमपेज › Soneri › तेनाली रामा : रामा राजीनामा देऊन साम्राज्‍य सोडणार?

रामा राजीनामा देऊन साम्राज्‍य सोडणार?

Published On: Dec 07 2018 12:34PM | Last Updated: Dec 07 2018 12:34PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

छोट्‍या पडद्‍यावरील प्राचीन कथेवर आधारित असलेली विनोदी मालिका 'तेनाली रामा' आपल्‍या लक्षवेधक कथांसह प्रेक्षकांची मने जिंकत आहे. रामा (कृष्‍णा भारद्वाज) साम्राज्‍यामध्‍ये आपला दर्जा अधिक सुधारण्‍याचा प्रयत्‍न करत असताना अखेर तो सम्राटाचा सल्‍लागार 'अष्‍टडीगज'च्‍या पातळीपर्यंत पोहोचतो. पण, आगामी एपिसोडमध्‍ये त्‍याला त्‍याच्‍या स्‍वत:च्‍या क्षमतांचीच परीक्षा घ्‍यावी लागणार आहे.

अखेर रामाने अष्‍टडीगजच्‍या एलिट समूहामध्‍ये प्रवेश केल्‍यानंतर तथाचार्य (पंकज बेरी) तपस्‍या करण्‍यासाठी दूर जातो. तेथे तो एका अत्‍यंत हुशार मुलगा 'महेश दास'ला भेटतो. बिरबल (भावेश बालचंदानी) म्‍हणून ओळखला जाणारा हा मुलगा त्‍याची हुशारी व बुद्धीसह तथाचार्यला प्रभावित करण्‍यामध्‍ये यशस्‍वी होतो. रामासोबत स्‍पर्धा करण्‍यासाठी तथाचार्य त्‍या मुलाला विजयनगरमध्‍ये घेऊन येतो. दरबारामध्‍ये एका रिकाम्‍या पत्राचे प्रकरण येते आणि रामा व बिरबल हे दोघेही या प्रकरणाचे निराकरण करण्‍याचा प्रयत्‍न करतात. पण बिरबल रामावर मात करत पत्रातील सांकेतिक मजकूर ओळखतो. त्‍यामध्‍ये विजयनगरवरील हल्‍ल्‍याबाबत बातमी असते आणि ते हल्‍लेखोरांना पराभूत करत साम्राज्‍याचे रक्षण करतात. बिरबल रामापेक्षा अधिक वरचढ ठरल्‍याने तथाचार्य रामाच्‍या बुद्धीबाबत प्रश्‍न निर्माण करतो. यामुळे रामाला काही कृत्‍यांमध्‍ये बिरबलासोबत स्‍पर्धा करावी लागते. अखेर रामाला समजते की, बिरबल त्‍याच्‍यापेक्षाही बुशार आहे आणि तो साम्राज्‍य सोडण्‍याचा आणि आपल्‍या पदाचा राजीनामा देण्‍याचा निर्णय घेतो.

रामाची भूमिका साकारणारा कृष्‍णा भारद्वाज म्‍हणाला, 'दरबाराला आपले महत्‍त्‍व पटवून देण्‍यासाठी रामाला त्‍याच्‍या पदामध्‍ये पदोन्‍नती मिळणे अत्‍यंत महत्‍त्‍वाचे होते. पण अष्‍टडिगज पातळीपर्यंत पोहोचल्‍यानंतर आणि बिरबलच्‍या प्रवेशासह रामा साम्राज्‍यामध्‍ये त्‍याची दर्जा टिकवून ठेवण्‍याचा प्रयत्‍न करू लागतो. या सीक्‍वेन्‍ससाठी शूटिंग करताना आम्‍हाला या ऐतिहासिक पात्रांबाबत भरपूर काही समजले, जे आनंददायक आहे.'