Thu, Jun 04, 2020 07:30होमपेज › Soneri › टीव्ही अभिनेत्रीचा मृतदेह आढळला घरात, दरवाजा तोडून पोलिस दाखल 

टीव्ही अभिनेत्रीचा मृतदेह आढळला घरात

Last Updated: Apr 10 2020 3:31PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन  

तेलुगू टीव्ही अभिनेत्री विश्वशांतीचा मृतदेह तिच्या हैदराबाद येथील राहत्या घरात आढळला. रिपोर्ट्सनुसार, विश्वशांती हैदराबाद येथील एस आर नगरमध्ये राहत होती. पोलिसांनी तिच्या घरचा दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर तिचा मृतदेह दिसला.

विश्वशांती आपल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील घरातून बाहेर न पडल्याने तिच्या शेजाऱ्यांनी पोलिसात तक्रार दिली. जेव्हा पोलिस तिच्या घरी पोहोचले, तेव्हा विश्वशांतीचा मृतदेह आढळला. विश्वशांती, विशाखापट्टणमची राहणारी होती. तिने तेलुगू भाषेत अनेक टीव्ही शोजमध्ये सपोर्टिंग अभिनेत्री म्हणून काम केले आहे.