होमपेज › Soneri › 'क्राईम पेट्रोल' फेम अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

'क्राईम पेट्रोल' फेम अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

Last Updated: May 27 2020 9:53AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

'क्राईम पेट्रोल', 'लाल इश्क' आणि 'मेरी दुर्गा' यासारख्या मालिकांमध्ये काम केलेली अभिनेत्री प्रेक्षा मेहताने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. इंदुर येथील तिच्या घरी तिने आत्महत्या केली. रिपोर्टनुसार, प्रेक्षाच्या वडिलांनी सकाळी तिला लटकलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर प्रकार लक्षात आला. रूग्णालयात नेल्यानंतर प्रेक्षाला मृत घोषित करण्यात आलं. प्रेक्षा २५ वर्षांची होती. ती १ वर्षांपूर्वी मुंबईत आली होती. 

प्रेक्षाने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या अखेरच्या इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिलं होतं की, "सर्वात वाईट असतं जेव्हा स्वप्ने मरतात." परंतु, कुणालाही अंदाज नव्हता की, खरोखरचं प्रेक्षाने आपलं जीवन संपवण्याचे संकेत या इन्स्टा स्टोरीमधून दिला आहे. 

दोन आठवड्यांपूर्वी टीव्ही अभिनेता मनमीत ग्रेवालनेदेखील फाशी घेऊन आत्महत्या केली होती. मनमीतनंतर लॉकडाऊन दरम्यान आत्महत्या करणारी प्रेक्षा दुसरी कलाकार आहे. प्रेक्षा एक थिएटर अभिनेत्रीदेखील होती. तिला नृत्याची आवडदेखील होती. प्रेक्षाने आत्महत्या का केली, याचे ठोस कारण अद्याप समजलेले नाही. परंतु, लॉकडाऊनमध्ये कुठलेही काम नसल्याने प्रेक्षाने आत्महत्या केली असावी, असा कयास लावला जात आहे. 

प्रेक्षाने मध्य प्रदेश स्कूल ऑफ ड्रामामधून शिक्षण घेतले होते. थिएटर कलाकार पुनीत तिवारीने एका वृत्तवाहिनीला सांगितले की, 'प्रेक्षा लॉकडाऊन लागू झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी इंदुरला आपल्या घरी परतली होती. ती एका चांगल्या आणि संपन्न परिवारातील आहे. तिने आत्महत्या केली, हे वृत्त खूपच धक्कादायक होतं. ती एक आनंदी आणि उत्साहाने काम करणारी मुलगी होती.' 'लाल इश्क', 'मेरी दुर्गा' यासारख्या मालिकांचे निर्माते प्रदीप कुमार म्हणाले, 'मी प्रेक्षाला कधी भेटलो नाही. परंतु, आत्महत्येच्या बातमीनंतर मी खूप स्तब्ध आहे.'

View this post on Instagram

Happy World Theatre Day Everyone! 🎭❤️

A post shared by Preksha Mehta 🎭 (@iamprekshamehta) on