Sun, Feb 23, 2020 15:08होमपेज › Soneri › 'सेरा नरसिंहा रेड्डी'चा टीझर पाहाच (VIDEO)

'सेरा नरसिंहा रेड्डी'चा टीझर पाहाच (VIDEO)

Published On: Aug 21 2019 2:25PM | Last Updated: Aug 21 2019 2:25PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

एकाच चित्रपटात दाक्षिणात्य आणि बॉलिवूड सुपरस्टार यांना पाहण्याची अनोखी पर्वणी सिने रसिकांना मिळणार आहे. या ऐतिहासिक चित्रपटाचे शीर्षक 'सैरा नरसिंहा रेड्डी' असे आहे. या चित्रपटाचे हिंदीमध्ये वितरण रितेश सिध्दवानी आणि फरहान अख्तर करणार आहेत. 'सैरा नरसिंहा रेड्डी' या चित्रपटाचे शूटिंग मागच्या २ वर्षांपासून सुरू होते. हा एक बिग बजेट चित्रपट आहे. आता दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी अभिनित 'सेरा नरसिंहा रेड्डी' या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. टीझर पाहिल्यानंतर हा एक ऐतिहासिक ड्रामा असल्याचे दिसते. 

नरसिंहाच्या व्यक्तिरेखेत दाक्षिणात्य चिरंजीवी दमदार भूमिकेत दिसत आहे. चिरंजीवी यांच्यासोबत बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि भोजपुरी सुपरस्टार रवी किशन मुख्य भूमिकेत आहेत. २ ऑक्टोबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटीशांविरुध्द एल्गार पुकारणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकाची ही सत्यकथा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुरेंद्र रेड्डी यांनी केले असून या चित्रपटाचा राम चरण निर्माता आहे. या चित्रपटात अमिताभ चिरंजीवीच्या मेंटॉरच्या भूमिकेत दिसणार आहे. 

जून महिन्यात या चित्रपटाचे शूटींग पूर्ण झाले. या चित्रपटाचा मेकिंग व्हिडिओ संध्याकाळी रिलीज होईल. सुपरस्टार चिरंजीवी, के. सुदीप, विजय सेतुपती, जगपतीबाबू, नयनतारा, तमन्ना आणि अनुष्का शेट्टी यांच्या यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

पाहा टीझर