Mon, Nov 18, 2019 22:05होमपेज › Soneri › सुश्मिताचे ब्रेकअप?

सुश्मिताचे ब्रेकअप?

Published On: Jul 12 2019 1:39AM | Last Updated: Jul 11 2019 10:04PM
माजी जगतसुंदरी, अभिनेत्री सुश्मिता सेन ही गेल्या काही दिवसांपासून खूश होती. कारण तिचे आयुष्य प्रेमाने बहरले होते. रोहमन शॉल नावाच्या व्यक्तीबरोबर तिचे नाव जोडले जाऊ लागले. दोघांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. अर्थात दोघे लवकरच विवाहाच्या बंधनात अडकण्याची चिन्हे होती. मात्र सध्याची स्थिती पाहता रोहमन आणि सुश्मिता सेन यांच्यातील रिलेशनशिपमध्ये काहीतरी गडबड असल्याचे दिसून येत आहे. परिणामी सुश्मिताने इन्स्टाग्रामवर रोहमनला फॉलो करण्याचे सोडले आहे. त्याचबरोबर रोहमन शॉलनेदेखील आपली इन्स्टा स्टोरीवर असे काही लिहिले की, त्यावरून दोघात काहीतरी ‘वाजले’ असे दिसून येते. रोहमनने म्हटले की, ‘हे तुम, हां तुमसे बात कर रहा हूं, क्या है जो तुम्हे परेशान कर रहा है? कम ऑन, मै यहाँ पूरे ध्यान से 24 घंटे तुम्हारी बात सून रहा हूँ.’ 

तो पुढे लिहतो, ‘तो तुम्हे लगता है कि तुम इस रिश्ते को चलाते रहने के लिए बहुत कुछ कर रहे हो और तुम्हारा पार्टनर कुछ नही कर राहा है। ठीक है। तुम्हे ये समझने की जरुरत है, की अपने पार्टनर के लिए जो करते हो वो आपका फैसला है। तो आप चाहते हे की आपका पार्टनर भी आपको वैसे ट्रीट करे, जैसे आप उसे कर रहे है, क्यों की आप उसके साथ रिलेशनशिपमे है। अगर कोई आपसे ठीक तरह से बर्ताव नही कर रहा और फिर भी आप उसके साथ रह रहे है तो ये आपकी गलती है। खुद से प्यार करिए।’  रोहमनच्या या पोस्टवरून दोघांत वादाची ठिगणी पडल्याचे स्पष्ट दिसून येते. अर्थात दोघे लवकरच एकत्र येतील आणि पुन्हा प्रेमाने नांदतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. 

- जगदीश काळे