Sat, Dec 14, 2019 09:55होमपेज › Soneri › सुशांतने गर्लफ्रेंडसाठी सोडले घर! 

सुशांतने गर्लफ्रेंडसाठी सोडले घर! 

Last Updated: Nov 13 2019 12:24PM

सुशांत सिंह राजपूतमुंबई : पुढारी ऑनलाईन

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि गर्लफ्रेंड रेहा चक्रवर्ती गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या रिलेशनशीपमुळे खूपच चर्चेत आले आहेत. याशिवाय अनेक पार्टीत सुशांत आणि  रेहा एकत्र स्पॉट झाले आहेत. तर सध्या एक नव्याने खबर असून सुशांत रियाच्या घरी आपले सर्व सामान घेवून गेला आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार, सुशांत सिंह राजपूत सुमारे १ आठवड्यापूर्वी वांद्रे येथील त्याच्या घराशेजारी असलेल्या रेहा चक्रवर्तीच्या इमारतीत शिफ्ट झाला आहे. तसेच सुशांत आपल्या बिल्डिंगमधून रेहा चक्रवर्तीच्या बिल्डिंगमध्ये बॅग आणि इतर वस्तू घेऊन गेला आहे.

वॉचमॅनने सांगितले आहे की, 'उशिरा रात्री होणाऱ्या पार्टीमुळे आणि मोठयाने लावण्यात येणाऱ्या संगीतामुळे सुशांतचे शेजारी अस्वस्थ होते. यांची तक्रार ही माझ्याकडे झाली होती परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही.'  

याआधी सुशांतचे नाव बॉलिवूड स्टार सारा अली खान आणि कृती सेनॉन यांच्याशीही जोडले गेले होते. त्यापूर्वी टिव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे हिच्याशी सुशांतचे नाव जोडले गेले होते.

(photo : sushantsinghrajput instagram वरून साभार)