Wed, May 22, 2019 20:16होमपेज › Soneri › सुदेश बेरीचा मुलगा पर्दापणास तयार

सुदेश बेरीचा मुलगा पर्दापणास तयार

Published On: Mar 15 2019 1:49AM | Last Updated: Mar 14 2019 8:15PM
सत्यजित दुर्वेकर

1990 च्या दशकातील ‘वंश’ चित्रपटातून हिट ठरलेला सुदेश बेरीचा मुलगा आता बॉलिवूडमध्ये पाऊल टाकण्यास सज्ज झाला आहे. सुदेश बेरीने अनेक चित्रपटात आघाडीचे रोल केले आहेत. तो चित्रपट आणि टिव्हीवर प्रसिद्ध कलाकार म्हणून ओळखला जातो. त्याच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक केले आहे.

अमिताभशी मिळतीजुळती स्टाईल (अभिनय नव्हे) असल्याने  तत्कालीन काळात त्याची बरीच क्रेझ निर्माण झाली होती. आता अशी एक बातमी आहे की, त्याचा मुलगा सूरज हादेखील बॉलीवूडमध्ये येण्यासाठी धडपड करत आहे. सुदेश हा लवकरच आपल्या मुलाला लाँच करतील असे दिसतेय. काही दिवसांपूर्वीच सुदेश बेरी हा जेव्हा ऑस्ट्रेलियातून आलेल्या मुलाला घेण्यासाठी विमानतळावर पोचला तेव्हा त्याची गळाभेट घेत तो भावनिक झाला. सूरज हा ऑस्ट्रेलियात मॉडेलिंग करण्याबरोबरच अभिनयाचा अभ्यासक्रमही पूर्ण करत आहे. तो चार वर्षानंतर भारतात परतला म्हणूनच तो लवकरच एखाद्या चित्रपटातून आपल्याला पाहवयास मिळेल, यात शंका नाही.