Mon, Nov 18, 2019 22:45होमपेज › Soneri › अ‍ॅक्शन अवतारात

अ‍ॅक्शन अवतारात

Published On: Jul 12 2019 1:39AM | Last Updated: Jul 11 2019 10:08PM
अलिकडे श्रद्धा कपूर ही आपला आगामी चित्रपट ‘साहो’ वरून खूप चर्चेत आली आहे. या चित्रपटाचे टीजर नुकतेच रिलिज झाले आहे. त्यात हिरो प्रभास हा फुल अ‍ॅक्शन अवतारात दिसणार आहे. विशेष म्हणजे श्रद्धा कपूरदेखील जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसून येत आहे. टीजर पाहून श्रद्धा कपूर प्रथमच आक्रमक भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे. तीदेखील बाहुबली फेम प्रभाससारख्या सुपरस्टारबरोबर काम करणे आणि भूमिका साकारण्यावरून उत्साहित आहे. चित्रपटात ती पोलिस अधिकार्‍याच्या भूमिकेत दिसणार आहे.

चित्रपटात पोलिस अधिकार्‍याची भूमिका साकारण्यात अभिनेत्रीचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. श्रीदेवी, रेखा, प्रियंका चोप्रा, बिपाशा बासू या अभिनेत्रींनी अ‍ॅक्शन भूमिका करून चाहत्यांना धक्का दिला आहे. आता श्रद्धा कपूर ही जबरदस्त पोलिस ऑफिसर म्हणून आपल्यासमोर येणार आहे. सोशल मीडियातही तिचा हॉट आणि बोल्ड लूक चाहत्यांना भावला आहे. अलिकडेच श्रद्धा कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यात ती लाल रंगाच्या गाऊनमध्ये आकर्षक दिसते. त्यात तिचा बोल्ड अंदाज चाहत्यांना खूपच आवडला आहे. ‘साहो’व्यतिरिक्त ती वरुण धवनसमवेत स्ट्रिट डान्सर थ्रीडीमध्ये देखील दिसणार आहे. त्यात ती एक जबरदस्त डान्सर म्हणून आपल्याला दिसणार आहे.

- मेघना ठक्कर