Thu, Mar 21, 2019 01:16होमपेज › Soneri › रोल...कॅमेरा...  अॅक्शन...'३१ दिवस'

रोल...कॅमेरा...  अॅक्शन...'३१ दिवस'

Published On: Jun 15 2018 10:53AM | Last Updated: Jun 15 2018 10:58AMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

रोल...कॅमेरा...  अॅक्शन... म्हणताना अनेक दिग्दर्शक आपण पाहिले असतील. मात्र, '३१ दिवस' सिनेमात प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता शशांक केतकर देखील आपल्या वेगळ्या अंदाजात हा डायलॉग बोलणार आहे. जिद्दीने आपल्या इच्छांचा, स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्या तरुणाची कथा या सिनेमाचा गाभा आहे. बी. एस. बाबू निर्मित आणि आशिष भेलकर दिग्दर्शित हा सिनेमा येत्या २० जुलै २०१८ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेत्री मयुरी देशमुख आणि रीना अगरवाल यांच्या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका आहेत. या टीझर पोस्टरमध्ये वापरलेली क्रिएटिव्हीटी  पाहता सिनेमा देखील असाच फूल ऑफ क्रिएटिव्हीटी असेल यात शंका नाही. बॉलिवूड टच आणि तोच ग्रँजर घेऊन आशिष भेलकर मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहेत.