Mon, Jan 27, 2020 10:43होमपेज › Soneri › 'देसी गर्ल' आणि 'विदेशी तडका'...सुपर हॉट प्रियांका!

'देसी गर्ल' आणि 'विदेशी तडका'...सुपर हॉट प्रियांका!

Published On: Jul 18 2019 8:46AM | Last Updated: Jul 18 2019 9:59AM
सीमा पाटील 

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राचा म्‍हणजेच पिगी चॉपचा आज (ता. १८ जुलै )वाढदिवस आहे.  मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावावर करणार्‍या प्रियांकाचे नाव बॉलिवूडच्या अशा निवडक अभिनेत्रींच्या यादीत आहे ज्यांनी अभिनयाच्या बळावर चित्रपट सृष्टीत स्वत:चा ठसा उमटवला. परंपरागत प्रतिमेला छेद देत आंतरराष्ट्रीय स्तरावरही अभिनेत्री म्हणून तिने वेगळी मोहर उमटवली आहे. लग्‍नानंतर प्रियांकाचा हा पहिलाच बर्थडे असल्याने बी टाऊन बरोबरच हॉलिवूडमध्येही चर्चा होणार ते तिच्या बर्थ'डे सेलिब्रेशन आणि ड्रेसिंग स्‍टाईलची. 

प्रियांकाच्या ड्रेसिंग स्‍टाईलची,  हॉट आणि बोल्‍डनेसची चर्चा सतत माध्यमातून होत असते. यावरुन काहीवेळा ती ट्रोल देखील झाली आहे. मात्र आतंरराष्‍ट्रीय माध्‍यमे प्रियांकाच्‍या याच स्‍टाईल स्‍टेटमेंटची दखल घेत भरभरून प्रशंसा करताना दिसतात. भारतीय असो किंवा वेस्‍टर्न पोषाख देसी गर्ल सर्व पोशाखात बिंधास्‍त वावरताना दिसते. कदाचित तिच्‍या याच बिंधास्‍तपणामुळे तिचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसते. म्हणूनच बॉलिवूडमधील बऱ्याच अभिनेत्री तिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतात.

ती फक्त हॉट लुकसाठी नाही तर तिच्या देसी लुकसाठीही प्रसिद्ध आहे. म्हणून तिची देसी गर्ल म्हणूनही ओळख आहे. नुकतेच इनस्टाईल या मासिकाच्‍या कव्‍हर पेजसाठी प्रियांकाने फोटोशूट केले होते. प्रियांका या फोटाशूटमध्‍ये देसी लुक म्‍हणजे साडीमध्‍ये दिसली. मात्र तिने ही साडी नेसली होती तीही विदाआऊट ब्‍लॉऊज म्‍हणजे  बॅकलेस. प्रियांकाच्‍या या बोल्‍ड अवतारामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. त्‍यावेळी प्रियांकाने काही फोटो सोशल मीडियावर देखील शेअर करत  फॅशन ग्‍लोबल कल्चरचा महत्वपूर्ण भाग असल्याचे म्हटले होते. 

Image result for priyanka chopra instyle magazine

यापूर्वीसुध्दा प्रियांका व्होग, मॅक्सिम, हॅलोसारख्या मॅगझीच्‍या कव्हर पेजवर झळकली आहे.  प्रियांका २०११, २०१३, १०१६ आणि २०१७ मध्‍ये मॅक्‍सिमची हॉटेस्ट गर्ल ठरली. तसेच २०१८ मध्‍ये देखील मॅक्सिम मॅगझीनने स्पेशल इश्यूमध्‍ये  प्रियांकाला स्‍थान देत जगातील सर्वांत हॉट महिला म्‍हणून गौरवले होते. इतकेच नव्हे तर  तिचा 'एक्झॉटिका' हा म्यूझिक अल्बम देखील जगभरात चांगलाच लोकप्रिय झाला. यासोबतच प्रियांकाला परदेशात खरी ओळख मिळवून दिली क्‍वाँटिंको या  इंग्रजी मालिकेने. या मालिकेमुळेच तिला हॉलिवूडचे दरवाजे उघडे झाले.

Related image

जो खुलेपणा प्रियांकाच्‍या वागण्‍यात, कपड्‍यात दिसतो, तो तिच्‍या विचारात देखील दिसतो. ती अनेक सामाजिक कार्यक्रमात सहभागी होताना दिसते. समाजिक विषयवार मत मांडत असते. प्रियांकाने आतंरराष्‍ट्रीय पातळीवर अभिनेत्री म्‍हणून नावलौकिक मिळवला आहे. त्‍याप्रमाणेच सामाजिक क्षेत्रातही आतंरराष्‍ट्रीय पातळीवर तिने नाव कमावले आहे. प्रियांका नेहमी पर्यावरण, आरोग्‍य, शिक्षण, बालकांचे हक्‍क तसेच महिलांचे अधिकार, महिला सबलीकरण व लैंगिक समानता, स्त्रीवाद यांसारख्‍या विषयावर बिंधास्‍त मत मांडत असते. 

युनिसेफने २०१६ मध्ये प्रियांकाची ‘गुडविल अ‍ॅम्बेसेडर’ म्हणून नियुक्ती केली आहे. २००६ पासून प्रियांका युनिसेफसोबत काम करत आहे. २०१० आणि २०१६ मध्ये बाल हक्कासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर युनिसेफची ‘गुडविल अ‍ॅम्बेसेडर’ म्हणून प्रियांकाची नियुक्त करण्यात आली होती. प्रियांकाच्‍या याच कार्याची दखल घेत युनिसेफच्या न्यूयॉर्कमधील प्रतिष्ठित कार्यक्रम ‘स्नो फ्लेक बॉल’मध्‍ये तिला सन्‍मानित करण्‍यात येणार आहे. याची माहिती युनिसेफने ट्विटरवरुन दिली होती. प्रियांकाच्‍या कामाचा गौरव म्‍हणून तिला ‘डॅनी काये ह्यूमॅनिटेरियन’ पुरस्‍कार देण्‍यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण ३ डिसेंबर रोजी होणार आहे. हा पुरस्‍कार न्यूयॉर्कमधील सर्वात प्रतिष्ठित समजल्‍या जाणार्‍या पुरस्‍कारापैकी एक आहे.

Image result for priyanka chopra

Related image

प्रियांकाचा मिस वर्ल्डपासूनचा बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत प्रवास प्रत्‍येकासाठी, विशेषकरुन स्‍त्रियांच्‍यासाठी प्रेरणादायी आहे. या प्रवासात तिच्‍यावर टीका झाली, अनेक अडथळे आले मात्र प्रियांकाने कधीच मागे वळून पाहिले नाही. लग्नानंतर चंदेरी दुनियेतील अभिनेत्रींचे करिअर संपुष्‍टात येते असा बहुतांश लोकांचा समज आहे. पण, प्रियांकाने लोकांचा हा समाज चुकीचा ठरवला. प्रियांकासोबत करिना कपूर, दीपिका पादुकोण, ऐश्‍वर्या राय-बच्‍चन, अनुष्‍का शर्मा याही अभिनेत्रींनी लग्‍नानंतरही यशस्‍वीपणे करिअरची धुरा सांभाळू शकतात हे दाखवून दिले. 

Related image

प्रियांकाने आतापर्यंत जवळपास ४० चित्रपटात काम केले आहे. यासोबतच हॉलिवूडमधील बेवॉच या चित्रपटात देखील काम केले आहे. प्रियांका आगामी  'स्‍काय इज पिंक' या चित्रपटात मुख्‍य भूमिकेत दिसणार आहे.  

मागीलवर्षी  अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत प्रियांकाने लग्नगाठ बांधली. डिसेंबर महिन्यात विलायती बाबू निक जोनाससोबत सहजीवनाच्या आणाभाका घेत दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने दोघे लग्नबंधनात अडकले. त्यावेळी प्रियांका आणि निक यांच्या वयातील अंतर चर्चेचा विषय ठरला. कारण निक तिच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान आहे. यावरून ती ट्रोलही झाली. पण या ट्रोलर्सना पुरुषाने दहा वर्ष लहान असलेल्या महिलेशी लग्न केले तर चालते, मग महिलेने आपल्या वयापेक्षा कमी वयाच्या पुरुषाबरोबर लग्न केले तर त्यात गैर काय, असे म्हणत तिने सडेतोड उत्तर दिले. 

Related image

प्रियांकाचे चाहते भारतातच नव्हे विदेशातही आहेत. देसी गर्ल विदेशी सून झाली असली तरी देशाचे नाव सातासमुद्रापार गाजवत आहे, हे तितकेच खरे आहे. जेव्‍हा ती देशाचे प्रतिनिधीत्‍व आतंरराष्‍ट्रीय पातळीवर करते, विविध फोटोशूट करते, तसेच काही कार्यक्रमांना हजेरी लावते तेव्‍हा  तिथे देखील प्रियांकाच्‍या नावाचा गवगवा होत असतो.  कदाचित देसी गर्ल आणि  विदेशी तडका हे समीकरण जुळून आल्‍यानेच ती सुपर हॉट झाली आहे असे म्‍हटले तर वावगे वाटायला नको.

Related image