Fri, Jun 05, 2020 22:18होमपेज › Soneri › रणबीर अर्ध्या रात्री आलियाच्‍या घरी (Video)  

रणबीर अर्ध्या रात्री आलियाच्‍या घरी (Video)  

Published On: Mar 15 2019 11:31AM | Last Updated: Mar 15 2019 11:31AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा आज (१५ मार्च) वाढदिवस. ती आपला २६ वा वाढदिवस साजरा करत आहे. विशेष म्‍हणजे, तिचा वाढदिवस साजरा करायला आलियाचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता रणबीर कपूर तिच्‍या घरी पोहोचला. अर्ध्या रात्री रणबीर आलियाचा वाढदिवस साजरा करायला गेला. रणबीरने आलियाला खास विशही केले. वाढदिवसाच्‍या सेलिब्रेशनचा व्‍हिडिओ सोशल मीडियाला व्‍हायरल झाला आहे. 

या दरम्‍यान, रणबीर कपूर ब्ल्‍यू आणि ब्लॅक कलरचा जॅकेट, स्काय ब्ल्‍यू रंगाची जीन्‍स आणि व्हाईट बूट घातलेला दिसला. रणबीर आलियाच्‍या घराबाहेर स्‍पॉट झाला. परंतु, आलिया भट्ट आपल्‍या घराबाहेर दिसली नाही. 

ज्‍यावेळी अभिनेत्री सोनम कपूरच्‍या वेडिंग रिसेप्शनमध्‍ये रणबीर-आलियाने एकत्र फोटो काढले होते. त्‍यावेळी दोघांच्‍या अफेअरचे वृत्त समोर आले होते. त्‍यानंतर रणबीरने संजू चित्रपटाच्‍या प्रमोशनवेळी खुलासा केला होता की, तो आलियाला डेट करत आहे. पुढे त्‍यांना अनेकवेळा एकत्र पाहण्‍यात आले. 

मुलाखतीत दोघांनीही लग्‍नाविषयी विचारण्‍यात आले होते. आलिया न्यू-यॉर्कमध्‍ये रणबीरचे वडील आणि अभिनेते ऋषी कपूर यांना भेटायला गेली होती. त्‍यानंतर, रणबीरच्‍या आईने नीतू सिंह यांनी आपल्‍या सोशल मीडियावर फॅमिलीचा फोटो शेअर केला होता. त्‍यामध्‍ये आलियादेखील दिसत होती. आलियाची आई सोनी राजदान यांनीही नीतू आणि त्‍यांचा  एकत्र असलेला फोटो शेअर केला होता. 

आलिया आणि रणबीर सध्‍या करण जोहरच्‍या प्रोडक्शन आणि अयान मुखर्जीच्‍या दिग्‍दर्शनाखाली बनत असलेला चित्रपट ब्रह्मास्त्रमध्‍ये एकत्र काम करत आहेत. हा चित्रपट यावर्षी २० डिसेंबरला रिलीज होणार आहे. 

(viralbhayani, yogenshah_s, filmy_chutzpah, masabagupta)