पुलकित आणि कृतीची वाढती जवळीक

Last Updated: Oct 10 2019 10:23PM
Responsive image

Responsive image

पुलकित सम्राट हा चित्रपटापेक्षा पर्सनल लाइफवरून अधिक चर्चेत राहतो. पत्नी श्वेता रोहियाशी घटस्फोट घेतल्यानंतर त्याचे नाव यामी गौतमीशी जोडले गेले होते. दोघांना अनेकदा एकत्र पाहूनही त्यांनी या नात्याचा कधीही स्वीकार केला नाही. आता त्याचे नाव अभिनेत्री कृती खरबंदाशी जोडले जात आहे. ते दोघे एक पंजाबी चित्रपट वीरे की वेडिंगमध्ये एकत्र दिसणार आहेत.

तसेच अनीज बाज्मी यांच्या पागलपंतीमध्येही दोघे आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांची जवळीक वाढली. कृती ही सम्राटसाठी घरातून दक्षिण भारतीय जेवण आणत असल्याचे वृत्त आहे. यावर सम्राट हा तिला चॉकलेट आणि फूल देतो, असे सांगितले जात आहे. शेवटी, हे दोघेही जेवणाच्या टेबलापर्यंत पोचलेले असताना त्यांनी आता प्रेमाचीही घोषणा करायला हरकत नाही.

- अवंती कारखानीस