ट्रॉफीसह प्रीतीने जिंकले १५ लाख रुपये

Last Updated: Oct 10 2019 10:46PM
Responsive image

Responsive image

सुपरस्टार सिंगरला आपल्या पहिल्यावहिल्या सत्राचा विजेता सापडला आहे. वर्धमान, पश्चिम बंगाल येथून आलेल्या 9 वर्षांच्या प्रीती भट्टाचार्जीला विजेती घोषित करण्यात आले. अंतिम फेरीत प्रीती भट्टाचार्जी, चैतन्य देवडे, हर्षित नाथ, स्नेहा शंकर, अंकोना मुखर्जी आणि निष्ठा शर्मा या सात स्पर्धकांमधील चढाओढ चुरशीची झाली आणि त्यांच्यातून सर्वात सरस कोण, हे ठरवणे प्रेक्षकांसाठी अवघड होऊन बसले. या सहाही स्पर्धकांना चिंग्जकडून 2 लाख रु. चा चेक शैक्षणिक आनंदाप्रीत्यर्थ देण्यात आला.

अलका याज्ञिक, हिमेश रेशमिया आणि जावेद अली या परीक्षकांनी बॉलीवूडमधील गाजलेली गीते सादर करून सेट दणाणून सोडला. दर्शन रावळच्या परफॉर्मन्सने या सोहळ्याला आणखी रंगत आणली. लक्ष्मीकांत-प्यारेलाल या संगीतकार जोडीतील प्यारेलालजीदेखील या छोट्या कलाकारांना आशीर्वाद देण्यासाठी सेटवर उपस्थित होते. हा शो देशभरातील ऑडिशन्समार्फत सुरू झाला होता, त्यात उमेदवारांनी अत्यंत उत्साहाने भाग घेतला होता. आपल्या पहिल्याच सत्रात या कार्यक्रमाने गायन क्षेत्रातील प्रतिभावंतांसाठी एक मापदंड स्थापित केला आहे.