Tue, Jan 21, 2020 05:10होमपेज › Soneri › 'तान्हाजी' चित्रपटाचा मराठी ट्रेलर पाहाच! 

'तान्हाजी' चित्रपटाचा मराठी ट्रेलर पाहाच! 

Last Updated: Dec 10 2019 1:24PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या तानाजी मालुसरे यांच्या शौर्याची गाथा मोठ्या पडद्यावर पाहयला मिळणार आहे. अजय देवगनची मुख्य भूमिका असलेला 'तान्हाजी : द अनसंग वॉरियर' या चित्रपटाची उत्सुकता फॅन्सना लागून राहिली असताना चित्रपटाचा मराठी ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

'जसा मातीच्या प्रत्येक कणात एक पर्वत असतोया, प्रत्येक बीमध्ये एक जंगल, प्रत्येक तलवारीत एक सेना....तसाच प्रत्येक मराठ्यात दडला आहे लाख मराठा...' असा दमदार डायलॉग चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ऐकवयास मिळतो. 

कोंढाणा किल्ला सर करण्याची जबाबदारी महाराजांनी तानाजी मालुसरे. यांच्यावर सोपवली होती. आपल्या मुलाचं लग्न बाजूला ठेवून तानाजी मालुसरे कोंढाणावर स्वारी करण्यास सज्ज झाले होते. 'आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं' अशी गर्जना करत तानाजी मालुसरे कोंढाणा मोहीम फत्ते करण्यासाठी गेले. आपल्या पराक्रमाच्या जोरावर मावळ्यांनी हा किल्ला जिंकलादेखी, पण, शत्रूचा सामना करताना ते धारातीर्थी पडले. 

तान्हाजी चित्रपट १० जानेवारी २०२० ला एकाच दिवशी हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये रिलीज होणार आहे. 

************************************************