मरणाच्या खाईत दोघांचा पाठशिवणीचा खेळ

Last Updated: Apr 30 2020 2:25PM
Responsive image

 धनश्री ओतारी
 


एव्हरग्रीन अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी कानावर धडकली आणि डी-डे चित्रपटातील अभिनेते इरफान खान तसंच ऋषी कपूर यांचा एकाच गाडीतील प्रवासाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. ऋषी कपूर यांच्या निधनाच्या आदल्या दिवशीच हरहुन्नरी अभिनेते इरफान खान यांनी जगाला अलविदा केले. 

दोघांचाही मृत्यू पाठोपाठ आणि डी-डे चित्रपटातील दोघांचा गाडीतील प्रवासाचा फोटो... दोघेही कारमध्ये मागच्या सीटवर बसलेले दिसत आहेत. कदाचित हा नियतीचा खेळच म्हणावा लागेल. कारण दोघेही मरणाआधी एकाच आजाराचा प्रवास अनुभवत होते. इरफान हे सतत पोस्टमधून मरणाची चाहूल चाहत्यांना देत होते. तर ऋषी कपूर हे सतत रुग्णालयात दाखल होऊन मरणाची चाहूल चाहत्यांना देत होते.

डी-डे चित्रपट मी पाहिलेला नाही. पण या चित्रपटाविषयी वाचलं असता निखिल अडवाणी दिग्दर्शित या चित्रपटात ऋषी कपूर हे पाकिस्तानात राहणारे गुंड असून इरफान खान यांनी एका गुप्तहेर अधिकारी वली खानची भूमिका साकारली होती. त्यावेळी इरफान यांनी ऋषी यांना यशस्वीरीत्या पकडले आणि त्यांना भारतात आणले, असे या चित्रपटाचे कथानक होते.

हा चित्रपटातील एक खेळ होता. थोडक्यात असाच खेळ खऱ्या जीवनात खेळला की काय असा प्रश्न मनी पडला. कारण मरणाच्या खाईत दोघांनीही पाठशिवणीचा खेळ खेळल्यासारखे वाटले... 

हे ही वाचा: मरणाच्या दारी सहज फेरी मारणारा अभिनेता...

दोघेही कर्करोगाच्या मैदानात जीवन जगण्यासाठी झुंज देत होते. पण या दोघांचीही झुंज अखेर अपयशी ठरली. 'मित्रा मी पहिला जातो आणि तू माझ्या मागून ये नाहीतर मरणाची झुंज हरल्याने आपल्या दोघा कुटुंबावर दुःखाचा डोंगर नव्हे तर शिखर कोसळेल' त्यामुळे तू माझ्या मागूनच ये अशी कुजबुज इरफान यांनी ऋषी यांच्या कानात केली नसेल ना? असा प्रश्न मनी पडला. 

कारण या दोघांच्याही आजाराचा प्रवास हा एकाच वर्षातून सुरू झाला. दोघेही एकाच वर्षात परदेशात उपचार करून भारतात परतले होते. काही कालावाधीतच दोघांनीही २४ तासाच्या आत जगाला अलविदा केले.  दुर्दैवी योगायोग म्हणजे देशात लॉकडाऊन असताना दोघांचेही निधन यादरम्यानचं झालं. ज्यांनी चाहत्यांना भरभरुन आनंद दिला, त्यांनी त्याच चाहत्यांना अंत्यदर्शन मात्र दिले नाही. त्यामुळे खरंच दोघांनी मरणाच्या खाईत पाठशिवणीचाच खेळ खेळला असेच म्हणावे लागेल. 

झुक गया आसमाँ, मिल गए दो जहाँ
हर तरफ़ है मिलन का समाँ
डोलियाँ है सजी, खुशबुएँ हर कहीं
पढ़ने आया खुदा खुद यहाँ....

शिराळा : ८१ वर्षाच्या वृद्धाला कोरोना; मणदूर गावात शुकशुकाट


'तो' कोरोना रुग्ण गेला कुणीकडे? केईएम प्रशासनाचा निष्काळजीपणा सुरुच!


'कोरोना अदृष्य पण, त्याचा सामना अपराजित कोरोना वॉरियर्सशी'


तुम्ही एकटे नाही! अमेरिकेतील आंदोलनाला गुगलचा खंबीर पाठिंबा


नागपूरातील कोरोना कंट्रोलचा मुंडे पॅटर्न; अर्ली ट्रेसिंग, मास क्वारंटाईन, टीम मॅनेजमेंट


तब्बल ८ पावसाळी नक्षत्रांची सुरुवात रविवारीच! 


संगीतकार वाजिद यांच्याबद्दल 'या' गोष्टी माहिती आहेत का?


सातारजवळ एकाचा डोक्यात दगड घालून खून


पाससाठी तब्बल २३ वेळा अर्ज करणारा बहाद्दर सापडला जाळ्यात!


पुण्यात बाधितांची वाटचाल आठ हजारांकडे